Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राहुल गांधींनी केलेले फ्लाइंग किस म्हणजे..., सुधीर मुनगंटीवारांचे भाष्य

राहुल गांधींनी केलेले फ्लाइंग किस म्हणजे…, सुधीर मुनगंटीवारांचे भाष्य

Subscribe

भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांनी केलेल्या फ्लाइंग किसच्या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. याच प्रकरणावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे.

नागपूर : बुधवारी (ता. 09 ऑगस्ट) लोकसभेतील भाषण संपवून संसदेबाहेर जाताना खासदार राहुल गांधी यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. भाषण संपल्यानंतर त्यांनी असभ्य वर्तन केले. त्यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, असा आरोपही स्मृती इराणी यांच्याकडून करण्यात आला. यातून राहुल गांधींच्या कुटुंबाचे संस्कार दिसले, अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. याच प्रकरणावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून येण्यासाठी केलेली कृती वाटते, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. (Sudhir Mungantiwar criticizes Rahul Gandhi’s act of flying kiss)

हेही वाचा – पत्रकार मारहाण प्रकरण : किशोर पाटलांवर कारवाई करण्याची पत्रकार संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

- Advertisement -

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अशी फ्लाइंग किसची कृती तोच नेता करू शकतो, ज्याच्या ओठामध्ये एक आहे आणि पोटामध्ये मोदीजी निवडून यावेत, असा भाव आहे. अन्यथा, या देशाच्या संसदेत अपमानजनक व्यवहार ही अपेक्षा कोणत्याही खासदाराकडून कधीच नसते, राहुल गांधींनी केलेल्या या कृतीचा भाजपलाच फायदा होईल आणि मोदीच पुन्हा निवडून येतील, असे मत देखील यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

जो नेता देशाचा पंतप्रधान व्हायचे स्वप्न पाहतो, तो कधी मनमोहनसिंगजी असताना कायद्याचे कागदं फाडतो, पुस्तकं फाडतो. लोकसभेत डोळा मारतो, अलिंगन देतो. कधी फ्लाइंग कीस देतो, एखाद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानेही अशी कृती करू नये, अशी कृती करून जगासमोर देशाचा नावलौकिक, गौरव कमी करण्याचे काम हा नेता करतो. इतर देशामध्ये अशा पद्धतीच्या कृतीला माफी नाही. आपल्या देशाची जनताही सुज्ञ आहे, आता निवडणुकीत त्यांना फ्लाइंग जागाच पाहावी लागेल, असा टोला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी केलेल्या कृतीचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले. देशासाठी जादूचा फ्लाइंग किस केलाय, असे राऊतांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यांवर देखील मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त करत राऊतांचा समाचार घेतला. कसे आहे, मती भ्रष्ट झालेल्यांना असे बोलावे लागते, यावर काय भाष्य करावे. आपल्याला धोका अशाच लोकांपासून आहे, हेच व्यक्तीमत्त्व लोकशाहीला आणि देशाला धोकादायक असतात. तसेच, उद्या तुमच्या कुटुंबातील आई-बहिणींकडे पाहून रस्त्यावर अशाप्रकारे फ्लाइंग किस केल्यावर तुमची भावना काय असेल?, तुमच्या रक्तात राग निर्माण होणार नाही?, याचं कसलं समर्थन करता?, उद्या तुमच्या आई-बहिणीकडे पाहून असं प्लाइंग किस केल्यास, देशाच्या प्रेमासाठी केलंय असं म्हटलं तर चालेल क?, काही लाज-लज्जा आहे की नाही, असे म्हणत मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना लक्ष केले.

- Advertisment -