घरताज्या घडामोडी'शिवसेने'कडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू, कोअर कमिटी बैठकीनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

‘शिवसेने’कडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू, कोअर कमिटी बैठकीनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Subscribe

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोर्टाने दिलेला निर्णय, शिवसेनेमध्ये झालेली फूट आणि राज्यामध्ये असलेली परिस्थिती या सर्वांवर भारतीय जनता पार्टीच्या कोअर टीमने मंथन केलं. भविष्यातील घडामोडींच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोअर टीमने पूर्ण लक्ष देऊन या निर्णयाकडे आपली भूमिका भविष्यात ठरवण्याचा निर्णय केला आहे, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू

शिवसेना आणि त्याचं बहुमत याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. बंडखोर आमदारांचा कुठलाही प्रस्तावाशी भाजपला काही देणघेणं नाही. शिवसेनेला जर ते मूळ स्वत:ची मानतात तर शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास पुन्हा भाजपची कोअर कमिटी बसेल, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टी आपली भूमिका ठरवेल

आज कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यामध्ये आणि विशेषकरून विधीमंडळामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं आकलन व त्याचा अंदाज केला गेला. राजकीय प्रश्न लक्ष घेऊन भारतीय जनता पार्टी आपली भूमिका ठरवेल. यावर चर्चेतून आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

वेट अँड वॉच या भूमिकेतून लक्ष दिलं जाईल

राज्यामध्ये असणाऱ्या अस्थिर परिस्थितीत वेट अँड वॉच या भूमिकेतून अजून काही लक्ष दिलं जाईल. त्यानंतर भारतीय जनता पार्टी एका भूमिकेपर्यंत येईल. बंडखोर आमदारांबाबत ते स्वत: आम्ही बंडखोर नाही, तर आम्हीच खरे शिवसैनिक, २४ कॅरेट शिवसेना आम्ही असल्याचा दावा ते करत आहेत. आता संजय राऊतांच्या शब्दात बंडखोर कोण आणि नॉटी कोण हे तर येणारा काळच सांगेल.

- Advertisement -

हेही वाचा : नालेसफाईचे काम झाले; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -