घरमहाराष्ट्रठाकरे सरकार जास्तीत जास्त तीन महिने; मुनगंटीवार यांची नवी भविष्यवाणी

ठाकरे सरकार जास्तीत जास्त तीन महिने; मुनगंटीवार यांची नवी भविष्यवाणी

Subscribe

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजप हे सरकार पडेल अशी भविष्यवाणी करत आहे. ठाकरे सरकार वर्ष देखील पूर्ण करणार नाही, असं भाजपचे नेते बोलत होते. दरम्यान, आता भाजपचे आमदार आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकार जाण्याची भविष्यवाणी केली आहे. ठाकरे सरकार जास्तीत जास्त तीन महिने टीकेल, त्यानंतर भाजप सत्तेत येईल, अशी भविष्यवाणी मुनगंटीवार यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सभागृहात ही भविष्यवाणी केली. त्यांच्या या भविष्यवाणीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस होता. यावेळी सभागृहात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारबद्दल भविष्यवाणी केली. जास्तीत जास्त तीन महिने, नंतर देवेंद्र फडणवीस तुम्हाला दीड वर्षांपूर्वीची चूक सुधारायची आहे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी थेट राज्यातील सत्ताबदलाचे संकेत विधानसभेत दिले. बुधवारी सभागृहात गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुनगंटीवार यांच्यात शायरीवॉर रंगलं होतं.

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जगजीत सिंह यांची एक गझल बोलून दाखवली. ‘सुधीरभाऊ, आपल्याला पाहून मला प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंह यांची एक गझल आठवली. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो… सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम हैं जिस को छुपा रहे हो?.’ गृहमंत्री देशमुख यांनी या ओळी सांगत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसून देशमुख यांना प्रतिसाद देत होते. यावर मुनगंटीवार यांनी देखील शायरीतून उत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी हैं, फिर से शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा हैं, हमारा दौर फिर से आयेगा,’ अशी शायरी बोलत एकप्रकारे ठाकरे सरकारबद्दल भविष्यवाणी केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -