घरताज्या घडामोडीसंजय राऊतांची पत्रकार परिषद शिवसेना संपवणारी, सुधीर मुनगंटीवारांची टीका

संजय राऊतांची पत्रकार परिषद शिवसेना संपवणारी, सुधीर मुनगंटीवारांची टीका

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवणारी ही पत्रकार परिषद होती. शिवसेना समाजसेवी ८० टक्के समाजकारण २० टक्के असे म्हणणारी शिवसेना आता १०० टक्के राजकारणात गेली असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन टीकास्त्र डागलं आहे. आम्हाला जेलमध्ये टाकलं तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू असा इशारा राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे. संजय राऊतांची पत्रकार परिषद ही शिवसेना संपवणारी होती अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. संजय राऊतांनी कारवाईला घाबरून सौदेबाजी केली असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही असा घणाघातसुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊतांना महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेत नाही आणि आपणही गंभीर घेण्याचे कारण नाही असा टोला मुनगंटीवार यांनी राऊतांना लगावला आहे. राऊतांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ते राज्यसभेसारख्या एका पवित्रा सभागृहाचे सदस्य आहेत. ज्या पद्धतीने ते भाष्य करताता, राज्यसभेचा सदस्य आहे. त्याची काही मर्यादा राखायला हवी तसेच एखाद्या सदस्याची उंची कशी नसावी हे राऊत दाखवून देतात अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

- Advertisement -

वाटाघाटीचा राजकीय सौदा जनतेला कसा पटेल

आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हाला जेलमध्ये टाकू हे वाक्य खंडणीच्या चौकटीत गंभीरतेने घेतले पाहिजे. आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालतो हे लोकशाहीला विपरीत आहे. सामान्य माणूस कोणताही स्वार्थ न बाळगता मतदान करत असतो. तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सौदेबाजी करता हे आश्चर्यजनक असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. जर उद्या कोणीही कोणत्याही पक्षाचा चुकत असेल तर तुम्ही आमची चौकशी थांबवा आम्ही तुमची करणार नाही. हे वाटाघाटीचा राजकीय सौदा हा जनतेला कसा पटेल. तुम्हाला जेलमध्ये टाकण्यासंदर्भात काय बोलायचे असेल ते बोला परंतु आम्हाला जेलमध्ये टाकले तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू याचा अर्थ काय धरायचा असा सवाल मुगंटीवार यांनी केला आहे.

शिवसेना संपवणारी पत्रकार परिषद

मतदानाच्या दिवशी सामान्य माणूस रांगेत उभा राहतो आणि कोणताही स्वार्थ न बाळगता मतदान करतो आणि तुम्ही पत्रकार पिरषद घेऊन सौदेबाजी करतात. याचे आश्चर्य वाटत असे मुगंटीवार म्हणाले आहेत. आज महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आणि सुडाच्या राजकारणाचा काय विषय आहे. नारायण राणेंवर कारवाई केली. भुजबळांच्या अटकेमध्ये सुडाचे राजकारण झाले आहे. यामुळे शिवसेनाचा दबदबा होता तो संपत चालला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवणारी ही पत्रकार परिषद होती. शिवसेना समाजसेवी ८० टक्के समाजकारण २० टक्के असे म्हणणारी शिवसेना आता १०० टक्के राजकारणात गेली असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरला जाता येणार नाही, राऊतांचा ईडी कारवाईवरुन फडणवीसांना इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -