घरताज्या घडामोडीमंत्र्याचा मुलगा महात्मा गांधींचे पुस्तक वाचतोय मात्र बाप वसुलीचे पैसे मोजतोय, मुनगंटीवारांचा...

मंत्र्याचा मुलगा महात्मा गांधींचे पुस्तक वाचतोय मात्र बाप वसुलीचे पैसे मोजतोय, मुनगंटीवारांचा घणाघात

Subscribe

शैक्षणिक पुस्तके वाचताना असे म्हणत असतील की मंत्रीचा मुलगा महात्मा गांधींचे पुस्तक वाचत आहे. परंतु ज्याचा बाप वसुलीमध्ये गोळा केलेल्या नोटा मोजत आहे. असा घणाघात भाजप नेते सुधीर मुगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय हे चंबलची घाटी झाली असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच हे सरकार दारुची ऊर्जा घेऊन राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम करत आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. राज्यातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरावरुनही राज्य सरकारवर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी मुनगंटीवार यांनी राज्यातील विषयांवरुन राज्य सरकारवर घणाघात केला आहे. वसुलीच्या मुद्द्यावरुन मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रालय चंबलची घाटी झाली आहे. भ्रष्टाचार पराकोटीला गेला आज अनेक प्रसंगी मंत्र्यांची पोरं बिचारी, शैक्षणिक पुस्तके वाचताना कदाचित म्हणत असेल मंत्रीचा मुलगा महात्मा गांधींचे पुस्तक वाचत आहे. परंतु त्या मुलाचा मंत्री बाप वसुलीमध्ये आलेल्या नोटा मोजत आहे. हे महाराष्ट्राचे चित्र आहे. कोणतीही अशी फाईल नसेल महाराष्ट्रात जी फाईल स्वतः म्हणत नसेल कोणाच्याही शिफारशीविना कोणतेही वजन ठेवल्याविना मी निघतेय इतका भ्रष्टाचार झाला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

- Advertisement -

मंत्रालयात बाजूला दारुची टाकी बांधू

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या असून त्या कशा आल्या अद्याप स्पष्ट झाले नाही. यावरुन मुनगंटीवार यांनी घणाघात केला आहे. हा महाराष्ट्र कुठे चालला? जनतेची सेवा करणारे सेवा केंद्र म्हणजे मंत्रालय, हजारोच्या संख्येने तिथे दारुच्या बाटल्या सापडतात, ठीक आहे एखादा पापी चुकीचा माणूस अशू शकतो. या क्षणापर्यंत १५ हजार कोटींचे बजेट ज्या पोलीस विभागावर आपण खर्च करतो अजून त्या विभागाला दारुच्या बाटल्या कोणी आणल्या हे माहिती नासल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मंत्रालयावर २०० कोटी रुपयांचा खर्च आहे. कोण दारुच्या बाटल्या आणल्या? दारुची ऊर्जा घेऊन या सरकारची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे हे काम करत आहे. पण दारु घेतल्यावर फाईलतरी वेगाने निघत आहेत का? पण त्या निघत नाही आहेत? हजारो बॉटल मंत्रालयात घेऊन फाईल नसती निपटाराच्या कायद्याने झाल्या असत्या तर बाजूला एक टाकीच बांधून दिली असती आणि थेट पाईपच जोडला असता असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  दिवाळीनंतर अर्थमंत्र्यांकडून राज्यांना बोनस, केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -