घरताज्या घडामोडीबाळासाहेब थोरात भाजपची ऑफर स्वीकारणार का?, सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

बाळासाहेब थोरात भाजपची ऑफर स्वीकारणार का?, सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं आहे. बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात भाजपची ऑफर स्वीकारणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात लढाई होण्याची शक्यता आहे. हेमंत रासने यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. या प्रचारात सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसमधील वादाचा आम्ही फायदा घेणार नाही. थोरात यांना आम्ही रस्त्यावर आणणार नाही. त्यांना कुठे जायचंय हा निर्णय त्यांनी स्वत; घ्यावा. पण काँग्रेस आता अध:पतनाला लागली आहे. महात्मा गांधी काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा भावनेवर आधारीत असतात. मुंबई तोडणार, असा लोकांमध्ये फक्त भ्रम निर्माण केला जात आहे. पण प्रत्यक्षात मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापामध्ये नाही. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून सर्वकाही निसटलं आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.


हेही वाचा : ठाण्यातील कोपरी रेल्वे पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, वाहतूक कोंडीपासून सुटका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -