घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: विनामुख्यमंत्री, विनाअध्यक्ष अधिवेशन पार पडण्याचा महाराष्ट्रात नवा पायंडा...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विनामुख्यमंत्री, विनाअध्यक्ष अधिवेशन पार पडण्याचा महाराष्ट्रात नवा पायंडा : सुधीर मुनगंटीवार

Subscribe

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहील्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. विनामुख्यमंत्री, विनाअध्यक्ष अधिवेशन पार पडण्याचा महाराष्ट्रात नवा पायंडा असल्याचं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत गाडीचा शोध लागला आहे. मुख्यमंत्र्यांविना लोकशाही असा प्रकार पहिल्यांदा पाहीला आहे. हे अधिवेशन मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. त्यावरून देखील मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या जाहिरातींवर महापौरांचा फोटा हवा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या जाहीरातींवर शरद पवारांचा फोटो वापरावा, असा सणसणीत टोला मुनगंटीवारांनी लगावला आहे.

पीएम मोदींनी राजीनामा द्यायला हवा

दरम्यान, नाना पटोले यांनी संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान उपस्थित नाहीत, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, मुनगंटीवरांनी त्यांना प्रत्यूत्तर दिलं आहे. मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकत नाहीत आणि नाना म्हणतात की, पीएम मोदींनी राजीनामा द्यायला हवा. कोणत्या प्रकारचे हे तर्क लावतायत हे माहिती नाही. असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कृषी पंपाबाबत देखील चुकीचा निर्णय

वीज बिलाची सूट यांना काढली असून कृषी पंपाबाबत देखील चुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. हे पहिलं चहापान असल्यामुळे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैरहजर होते. असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021 : शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी, सुनील प्रभूंनी दिली प्रतिक्रिया…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -