घरताज्या घडामोडीराज्यात विषारी विचार पेरणाऱ्यांचे बुरखे फाडणारच, सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

राज्यात विषारी विचार पेरणाऱ्यांचे बुरखे फाडणारच, सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

Subscribe

याकूब मेमन कबर प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अमृत महोत्सवी वर्षांत विषारी विचार पेरणाऱ्यांचे बुरखे फाडणारच, असा इशारा भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी याकूबच्या कबरीवर सुशोभीकरण कोणी केले, याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी समिती निर्गमित करतो आणि समितीची घोषणा करतो. तसेच या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करतो. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चौकशी करतो. आतापर्यंत गुप्तचर विभागाची माहिती का मिळाली नाही.

- Advertisement -

ही कोणत्या मताची लाचारी?

या घटना गेल्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगण्यात आल्या होत्या का?, सांगण्यात आल्या नव्हत्या तर का सांगण्यात आल्या नाहीत?, त्यांना सांगण्यात आल्या असतील तर त्यांनी यावर कारवाई का केली नाही, ही कोणत्या मताची लाचारी होती. याकडे दुर्लक्ष करा असं सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेरून आदेश होता का? हे सर्व जनतेच्या समोर आलं पाहीजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

…तर भारत तोडो हेच धोरण राबवले

देशभरात कॉंग्रेसमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळेच एक एक राज्य कॉंग्रेसच्या हातून निसटत चालला आहे. तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांमध्येही आपसांत भांडण होत आहेत. तसेच पक्ष आता भारत जोडो ही यात्रा जरी काढत असला तरी या पक्षाने सत्ता असताना भारत तोडो हेच धोरण राबवले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.


हेही वाचा : टीएमटीची पारसिक नगर ते वाशी रेल्वेस्थानक बससेवा सुरू, जितेंद्र आव्हाडांचा बससेवेला हिरवा झेंडा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -