मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात…, सुधीर मुनगंटीवार यांची टीका

भाजपने आज मुंबईतील कार्यालयात जल्लोष केला. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जनता राज येईल, अशी टीका केली.

sudhir mungantiwar

आज भाजपने मुंबईतील कार्यालयात जल्लोष केला. यावेळी भाजप नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जनता राज येईल आणि घराणेशाहीचे राज्य संपुष्टात येईल अशी टीका केली.

मुंबई भाजपा कार्यालयात सत्तास्थापनेचा जल्लोष सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचा कट-आऊट हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता हा त्यागासाठी नेहमीच लक्षात राहिल असे ते म्हणाले. तसेच, मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जनता राज येईल आणि घराणेशाहीचे राज्य संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. यासोबतच भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी, ‘विधानसभा तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है’, अशा घोषणाही दिल्या. यावेळी ‘पद का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढते जाना’ असे फलक घेऊन कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षादेश मानत सर्वोच्च पदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले याचे साऱ्यांनीच कौतुक केले.

 देवेंद्र फडणवीसांची जल्लोषाला  अनुपस्थिती – 

भाजपच्या जल्लोषाला मंगल प्रभात लोढा उपस्थित होतो. मात्र, भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. यावर सत्तेच्या वाटाघाटीच्या बैठका सुरू असल्याने फडणवीस अनुपस्थित आहेत, असे भाजपने स्पष्टीकरण दिले आहे.