घरताज्या घडामोडीपदवीधर निवडणूक : उमेदवार बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; नाना पटोलेंचे वक्तव्य

पदवीधर निवडणूक : उमेदवार बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; नाना पटोलेंचे वक्तव्य

Subscribe

पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर आज नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार बदलाबाबत माहिती घेऊन भाष्य करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे डॉ. सुधीर तांबेच असल्याचे स्पष्ट वक्तव्य नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये केले.

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ”पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारात अचानक बदल का करण्यात आला, याचीही कोणती माहिती नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल”

“या सगळ्याची पक्षीय पातळीवर चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर या मुद्यावर अधिक प्रतिक्रिया देऊ”, असेही नाना पटोले यांनी सांगितले. शिवाय, “विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज का भरला नाही, याची माहिती घेतली जात आहे. सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय करावे, हे त्यांनीच ठरवावे. उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेताना विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली असे समजते. त्यामुळे नेमका हा निर्णय का घ्यावा लागला. त्याबद्दल चर्चा करू” असेही पटोले यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पालिकेतील ‘या’ प्रकल्पावरून ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -