घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये मेव्हणीच्या घरी केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

नाशिकमध्ये मेव्हणीच्या घरी केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Subscribe

मेव्हणीच्या घरी जावून एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू फकिरा पाटील (वय ४४ रा. मातृवंदन सोसा. स्वराजनगर, नवले मळा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजू पाटील हे शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी रायबा हॉटेल परिसरात राहणारे साडू भाऊ केशवराव श्रीरंगराव देशमुख (रा. शिवालय बंगला, शिवकॉलनी, कडवेनगर) यांच्या घरी गेले होते. पाटील यांनी अज्ञात कारणातून बंगल्यामधील स्टोअर रूममधील अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब देशमुख कुटुंबियांच्या निदर्शनास येताच साडू केशवराव देशमुख यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गोसावी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -