घरमहाराष्ट्रसांगलीतील एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या

सांगलीतील एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या

Subscribe

येथील कवठेमहांकाळ एसटी आगारामध्ये चालक म्हणून सेवेत असलेले भीमराव सूर्यवंशी यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाचे रहिवासी आहेत. सूर्यवंशी ग्रामीण मार्गावर चालकपदावर काम करीत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे निम्मा फेब्रुवारी महिना उलटला तरी ८८ हजार एसटी अधिकारी-कर्मचार्‍यांचा डिसेंबरचा पगार झालेला नाही. त्यामुळे कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सरकारकडून वेतनासाठी २२३ कोटी
एसटी कर्मचार्‍यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी २२३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली, पण एसटी महामंडळाला पूर्ण रक्कम न दिल्यामुळे कर्मचार्‍यांचा पीएफ, ग्रुज्युईटीची रक्कम कापली जाणार नाही. एसटी महामंडळाला दरमहा ३६० कोटी रुपयांची रक्कम देण्याची हमी राज्य सरकारने न्यायालयाला दिली होती, पण शिंदे-फडणवीस सरकारने महामंडळाला एकदाही ३६० कोटी रुपयांची पूर्ण रक्कम दिलेली नाही.

- Advertisement -

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या संपूर्ण पैशांचा हिशोब महामंडळाकडे मागितला होता. त्याप्रमाणे महामंडळाने खर्चाचे संपूर्ण विवरणपत्र राज्य सरकारला सादर केले. त्यानंतर राज्य सरकारने महामंडळाला २२३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. एसटी महामंडळाची राज्य सरकारकडे एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -