पुण्यात शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या निलेश माझीरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या निलेश माझीरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. निलेश माझीरे हे पुण्यातील माथाडी जिल्हा अध्यक्ष असून, त्यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम-राम ठोकला होता. (Suicide Of Wife Of Shinde Group Nilesh Mazire Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश माजरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केल्याचे समजते. विष प्राशन केल्याचे समजताच त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अद्याप निलेश माझीरे यांच्या पत्नी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. सध्या पुणे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान त्यांच्या पत्नीने विष प्राशन केल्यानंतर कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. निलेश माजरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माजरे यांची मनसेला ‘जय महाराष्ट्र’करत जवळपास ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

काही महिन्यांपूर्वी निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत आपली नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, राज ठाकरे यांनी माझिरे यांची समजूत काढली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. निलेश माझिरे हे पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अलीकडेच वसंत मोरे हे पक्षावर पुन्हा एकदा नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी होणे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे.


हेही वाचा – नागरिकांनो काळजी घ्या! येत्या वीकेंडला हवामानात मोठा बदल होणार; हवामान विभागाचा अंदाज