घरमहाराष्ट्रपुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे विदर्भातील मंत्र्याच्या संबंधाच्या चर्चा, भाजप चौकशीसाठी आक्रमक

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे विदर्भातील मंत्र्याच्या संबंधाच्या चर्चा, भाजप चौकशीसाठी आक्रमक

Subscribe

पुजाची आत्महत्याही सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे कारण या आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा भाग असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ७ फेब्रुवारीला पुण्यात एक तरुणीने सोसायटीच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी ही तरुणी आपल्या भावासोबत पुण्यात राहत होती.  प्रेमसंबंधातून पुजाने आत्महत्या केली अशा चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. पुजाची आत्महत्याही सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे कारण या आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा भाग असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप या प्रकरणावर आक्रमक झालेली पहायला मिळत नाही. भाजपने या प्रकाराची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर भाजपच्या महिला नेत्याही पुजाच्या आत्महत्या प्रकरणी आक्रमक झालेल्या पहायला मिळत आहे.

पुजा चव्हाण ही मुलगी मुळची परळीची. २२ वर्षांची पुजा पुण्यात शिकण्यासाठी आली होती. पुण्याच्या हडपसर परिसरात ती तिच्या भावासोबत राहत होती. त्याचबरोबर स्पोकन इंग्लिश स्पिकिंगचा क्लासही करत होती. हडपसर येथील महमंदवाडी परिसरातील हेवन पार्कमध्ये ती राहत होती. ७ फेब्रुवारीला रात्री १ वाजतच्या सुमारास पुजा सोसायटीच्या तिसऱ्या माळ्यावर गेली. तिने सोसायटीच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारली आपले आयुष्य संपवले. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. पुजाने आत्महत्या करण्याआधी कोणतीही सुसाइड नोट किंवा मेसेज लिहिला नाही. प्रेमसंबंधातून पुजाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पुजाच्या आत्महत्येचा आणि विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.

- Advertisement -

पुजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेनंतर तिच्या आत्महत्येंच्या संबंधित काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिप्समध्ये एक व्यक्ती काहीतरी प्रकरण दाबण्याच्या सुचना देत आहे. मात्र याची माहिती पोलिसांनी आणि पुजाच्या कुटुंबियांनीही दिलेली नाही. वानवडी पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनीही चौकशीसाठी मागणी करावी करण्याचे निवेदन भाजप महिला नेत्या अर्चना पाटील यांनी दिले आहे.


हेही वाचा – भीमा कोरेगाव प्रकरणाला नवे वळण, हॅकरनेच प्लांट केले ‘ते’ पुरावे

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -