घरमहाराष्ट्रसुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून नगरची जागा लढवणार?

सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून नगरची जागा लढवणार?

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आता सुजय हे राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसलाकरता ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील हे काहीसे नाराज होते, तर माझ्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला तरी मला काही वाटणार नाही, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे सुजय हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चांना उधाण आले असतानाच आता एक नवीन बातमी येत आहे. सुजय यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीतूनच ही अहमदनगर लोकसभेची जागा लढवावी, असा पर्याय विखे पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगरच्या जागोवरून तिढा कायम

पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप जवळपास निश्चित झाले आहे. मात्र अहमदनगरच्या जागोवरून तिढा कायम होता. अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी-काँग्रेसने काँग्रेससाठी सोडण्यास नकार दिल्याने या जागेबाबत आघाडीत कटुता निर्माण होईल, असे चित्र दिसत होते. अशातच सुजय विखे पाटील यांनी माझ्याकडे भाजपचा पर्याय मोकळा असल्याचे जाहीर केले होते. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे असली तरी यावेळी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. २०१४ च्या निवडणुकीत राजीव राजळे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या दिलीप गांधी यांचा ते पराभव करु शकले नाहीत. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे भाजपमध्ये गेल्या होत्या. सध्या त्या पाथर्डीच्या आमदार आहेत. राजीव राजळे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी उमेदवारांच्या शोधात आहे.

- Advertisement -

अहमदनगर मतदारसंघात विखे पाटीलांचे वर्चस्व

अहमदनगर मतदारसंघात विखे पाटील यांचे पूर्वीपासून वर्चस्व आहे. मात्र २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अहमदनगर राष्ट्रवादीकडे तर शिर्डी मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता. २००९ आणि २०१५ साली दोन्ही पक्षांना आपला खासदार इथून जिंकून आणता आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -