मुंबई : शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिलं जातं. संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. त्यामुळे साई संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. पण मागणीनंतर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांसह सर्वांच्याच टीकेचा सामना करावा लागला. अशात पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे या वक्तव्यामुळे सुजय विखे पाटील पुन्हा विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (sujay vikhe patil will file a public interest litigation in the court to get permission to kill leopards)
राज्यात सातत्याने बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. याच बिबट्यांच्या हल्ल्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे बिबट्यांच्या हल्ल्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय सुजय विखे पाटील यांनी घेतला आहे.
त्यानुसार, “बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली. यासंदर्भातवनविभागाकडून माहिती घेत असून, मी यावर अभ्यास करत आहे. वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात जाणार आहे”, असे सुजय विखे यांनी म्हटलं.
याशिवाय, “संगमनेर आणि राहाता तालुक्यात अनेकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वनविभागाकडून मी सर्व माहिती घेत आहे. माझाही यावरील अभ्यास आता पूर्ण होत आला आहे. या संदर्भात लवकरच मी जनहित याचिका दाखल करणार आहे. बिबट्या माणसांना मारू शकतो. मात्र, बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे”, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा – Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, आम्ही ठाकरेंसोबतच राहणार – अरविंद सावंत