Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : सुलभा खोडके पडल्या काँग्रेस उमेदवारावर भारी; 5...

Maharashtra Election Result 2024 : सुलभा खोडके पडल्या काँग्रेस उमेदवारावर भारी; 5 हजार मतांनी केला पराभव

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या सुलभा खोडके यांच्यासमोर काँग्रेसच्या सुनील देशमुख यांचं तगडं आव्हान होतं. पण आज समोर आलेल्या निकालामध्ये सुलभा खोडके यांनी विजय मिळवला आहे.

अमरावती : या मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे सुनील देशमुख यांच्यात प्रमुख लढत पार पडली होती. सुलभा खोडके यांच्यासमोर काँग्रेसच्या सुनील देशमुख यांचं तगडं आव्हान होतं. पण मतदान पार पडल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये सुलभा खोडके या संभाव्य आमदार असतील, असं सांगण्यात आलं होतं. यानंतर आज समोर आलेल्या निकालामध्ये सुलभा खोडके यांनी विजय मिळवला आहे. (Sulabha Khodke wins from Amravati constituency in the assembly elections)

अमरावती मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण यंदा अमरावती विधानसभा जागा संपूर्ण राज्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत सुलभा खोडके यांनी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. यानंतर त्यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसकडून सुनील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता देखील निवडणूक रिंगणात उतरले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत सुलभा संजय खोडके, सुनील देशमुख, अपक्ष जगदीश गुप्ता यांच्यासह 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यामुळे मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि झालेही तसेच. सुलभा खोडके यांना 60087 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे सुनील देशमुख हे 54674 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत. याशिवाय आझाद समाज पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांना 54591 मते मिळाली. सुलभा खोडके आणि सुनील देशमुख यांच्या मताधिक्क्यावर नजर टाकली तर सुलभा खोडके या 5496 मतांनी विजयी झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : शिंदेंसोबत गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -