घरमहाराष्ट्रManoj Jarange Patil यांची 'आरक्षणा'बाबतच्या वक्तव्यावरून सारवासारव

Manoj Jarange Patil यांची ‘आरक्षणा’बाबतच्या वक्तव्यावरून सारवासारव

Subscribe

आज मनोज जरांगे पाटील यांना यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, बलुतेदार आणि अलुतेदार यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती.

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर मुद्यावर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी असून यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. पण आता मराठा आरक्षण दोन दिवस उशिरा मिळाले तरी चालेल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी एका भाषणादरम्यान केले आहे. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांना यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, बलुतेदार आणि अलुतेदार यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती. मराठा आरक्षण दोन दिवस उशिरा मिळाले तरी चालेल. पण सर्व शांततेने करू असे, या वक्तव्यावर सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा स्वर बदलले.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ…; अधिवेशनापूर्वी वडेट्टीवार कडाडले

समजाचा कधीच घात नाही झाला पाहिजे

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ” माझ्या शब्दश: अर्थ नका घेऊ. समाज मोठा आहे. समाजाचा विश्वसा संपादन करताना. समजाचा कधीच घात नाही झाला पाहिजे. हे मला सांगयाचे होते. समाज महत्वाचा आहे. दोन दिवस उशीराने यांचा अर्थ 24 डिसेंबरनंतर नाही. 24 डिसेंबर ओलांडल्यावर त्यांना सुट्टी नाही. मराठवाड्यात बोलण्याचा एक भाग आहे की, दोन दिवस लेट पण आपले संबंध खराब नाही झाले पाहिजे, असे बोलणे असते. समाज महत्वाचा. समाज एकवटला आहे. मी दोन दिवस लेट का म्हटले की, हे चित्र बघण्यासाठी माझा समाज 70 वर्ष स्वप्न बघत होता.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation: ‘यापुढे महाराष्ट्रात मराठे राहणार नाहीत…’; भुजबळ संतापले, मागासवर्ग आयोगावर घणाघाती टीका

पोरे-बाळे उघड्यावर पडणार असतील तर…

तुमच्या आरक्षणाला हात लावणार नाही. पण सरसकट आरक्षण पाहिजे, या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “हे लोक म्हणता की आरक्षणाची एसटी पुर्णपणे भरलेली आहे. मग आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत की, खरच एसटी भरली का? ते स्वत:ला ओबीसींचा नेता म्हणत असतील तर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायला हवी होती. वेगळा प्रवर्ग तयार करून हे माझे भाऊ आहेत. माझाच ओबीसीत आहेत. त्यांना लगेच वेगळे करा. मग त्यांना भांडण्याची गरज काय, त्यांचा हा भाऊ आहे. पण पोरे-बाळे उघड्यावर पडणार असतील तर त्यांना वेगळे आरक्षण द्यायला काय अडचण आहे”, असा सवाल मनोज जरांगे पाटली यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -