घरताज्या घडामोडीआजपासून राज्यातील शाळांना उन्हाळ्याची सुट्टी, १५ जूनला सुरु होणार नवे शैक्षणिक वर्ष

आजपासून राज्यातील शाळांना उन्हाळ्याची सुट्टी, १५ जूनला सुरु होणार नवे शैक्षणिक वर्ष

Subscribe

१५ जूनला नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सर्व शाळा ऑनलाईन माध्यामातून सुरु आहेत. आजपासून त्या सर्व शाळांना उन्हाळ्याचा सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. १५ जून पासून राज्यातील सर्व शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. याआधी सुट्ट्यांचा कालावधी हा १३ जून पर्यत असून त्या नंतर १४ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या १४ जून पर्यंत ठेवून १५ जूनला नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील उन्हाचे तापमान पाहता विदर्भातील शाळा २७ जून पासून सुरु होतील.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षक संघटनेकडून हे शैक्षणिक वर्ष संपवून सुट्टी जाहीर करावी अशी विनंती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी यावर निर्णय दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली १३ महिने विद्यार्थी व शिक्षक ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील माहिती कळवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शाळेतून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळच्या सुट्ट्या देण्यात याव्या यासंबंधी जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने जाहिर करण्यात येणार आहे. या सुट्ट्या जाहीर करताना माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार, शैक्षणिक वर्षात ७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पहिल्या लॉकडाऊनपासून विद्यार्थी व शिक्षक झूम कॉल,गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचया परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे दहावी बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. जून महिन्यात कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा पुन्हा ऑफलाईन सुरु करणार की ऑनलाईन यावर विचार केला जाणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात कडक निर्बंध लावले नसते, तर आज भयानक परिस्थिती असती!

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -