Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू; जाणून घ्या हवामान विभागाने काय म्हटलंय...

राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू; जाणून घ्या हवामान विभागाने काय म्हटलंय…

Subscribe

मुंबई | राज्यात अवकाळी पाऊसामुळे (Unseasonal Rain) शेतकरी हवालदिल झाला आहे. यात आता राज्यात मोचा चक्रीवादळमुळे (Cyclone Mocha) देशातील अनेक राज्यावर परिणाम पाहायला मिळत आहेत. सध्या मोचा चक्रीवाद पश्चिम बंगालहून (West Bengal) हळूहळू पुढे सरकले आहे. यामुळे राज्यात उन-पाऊस असा खेळ सध्या सुरू आहे. मुंबईत कडाक्याचे उन पडल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत तर, राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे.

मुंबई आणि उपनगरात उन्हाचा तडाखा पहायला मिळत आहे तर, दुसरीकडे राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जवळपासच्या जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून पाऊस सुरू असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढील काही दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिली, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हवामान खात्याकडून माहिती मिळाली की, अवकाळी पाऊसामुळे राज्यातील अनेक शहरात वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजेच्या विजेच्या गडगडाटासह जोरदार वारा वाहत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेत. अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.

राज्यात चक्रवातविरोधी स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली असून तापमानाचा पारा चढण्याची शक्यता वर्तवली जाते. यंदा मे महिन्यात मुंबईकरांना उष्णतेचे तापमान वाढलेले आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता. चक्रवातविरोधी स्थितीमुळे मुंबईतील तापमान ३७ ते ३८ अंशांदरम्यान पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -