Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSharad Pawar : पवारांच्या सत्तेतील सहभागाबाबत रोहित पवारांच्या आईचे महत्त्वाचे विधान; म्हणाल्या...

Sharad Pawar : पवारांच्या सत्तेतील सहभागाबाबत रोहित पवारांच्या आईचे महत्त्वाचे विधान; म्हणाल्या…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गुरुवारी (12 डिसेंबर) 85 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत वाढदिवसाचे निमित्त साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचे काका शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी शरद पवारांच्या सत्तेतील सहभागाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गुरुवारी (12 डिसेंबर) 85 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक दिग्गज नेत्यांनी नवी दिल्लीत पवारांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. महत्त्वाचे म्हणजे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत वाढदिवसाचे निमित्त साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचे काका शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी शरद पवारांच्या सत्तेतील सहभागाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. (Sunanda Pawar important statement regarding Sharad Pawar participation in power)

दरवर्षीप्रमाणे यंदाही 20 ते 25 डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात ‘भीमथडी जत्रेचं’ आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुनंदा पवार आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, गेल्या 18 वर्षांपासून भीमथडी जत्रा सुरू आहे. या जत्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे यंदाही 20 ते 25 तारखेदरम्यान भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या भीमथडी यात्रेत सव्वा तीनशे स्टॉल असणार आहेत. तसेच 18 राज्यातील महिला यामध्ये सहभागी होणार आहेत. जत्रेमध्ये दीड लाख पर्यटक सहभागी होत असतात. याचं सर्व श्रेय महिला बचत गटांना जातं. तसेच यंदाची जत्रा आप्पासाहेब पवार यांना समर्पित करणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे यावेळच्या भीमथडी जत्रेचं बजेट सव्वा दोन कोटी असणार आहे, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी भेट नाकारली, उद्धव ठाकरेंनी संतापून म्हटले…

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, भीमथडी जत्रेचं आम्ही सर्व आमदारांना निमंत्रण देत असतो. यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. शरद पवार दरवर्षी जत्रेला भेट देत असतात, यावर्षी पण भेट देणार आहेत. त्यामुळे यंदा महिला बचत गटाच्या पाच महिलांच्या हस्ते उदघाटन करण्याचा आमचा विचार आहे. तसेच मुंबईत भीमथडी जत्रा करण्याचे आमचे नियोजन आहे, अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुनंदा पवार?

दरम्यान, पत्रकार परिषदेत सुनंदा पवार यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्या दिल्लीतील भेटीबाबत प्रश्न विचारण्यत आला. यावर त्या म्हणाल्या की, शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटुंबीयांची भेट ही राजकीय नव्हती तर कौटुंबिक होती. परंतु मला वाटतं की, दोन्ही राष्ट्रवादीने आता एकत्र येण्याची गरज आहे. कारण मूठ घट्ट राहिली तरच ताकत वाढणार आहे. सत्तेसोबत जायचं का? याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत. परंतु कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रवादीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचीही गरज आहे, अशी मागणीही सुनंदा पवार यांनी दिली.

हेही वाचा – Priyanka Gandhi : पहिलंच भाषण अन् सत्ताधारी पाहतच राहिले, प्रियांका गांधींनी भाजपला सोलून काढलं; एका व्यक्तीचं नाव घेताच…


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -