आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! गैरसोय टाळायची असेल तर वेळापत्रक जरूर तपासा

गैरसोय टाळायची असेल तर घराबाहेर पडताना लोकलची स्थिती जाणून घेऊनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्हाला सुट्टीच्या दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागेल. आज ब्लॉक दरम्यान तिन्ही मार्गांवरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहे.

तांत्रिक कामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर दर रविवारी ब्लॉक घेण्यात येतो. त्याचप्रमाणे, आजही ब्लॉक घेण्यात आला असल्याने वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळायची असेल तर घराबाहेर पडताना लोकलची स्थिती जाणून घेऊनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्हाला सुट्टीच्या दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागेल. आज ब्लॉक दरम्यान तिन्ही मार्गांवरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहे. याची माहिती खालीलप्रमाणे. (Megablock on central, western and harbour railway)

मध्य रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार मार्गावर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून हा ब्लॉक असेल. ३ वाजून ५५ मिनिटांनी हा ब्लॉक संपेल. या काळात काही धिम्या लोकल रद्द करण्यात आल्या असून काही धीम्या लोकल जलद मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. विद्याविहारच्या पुढे कल्याणच्या दिशेने मात्र धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या सुरळीत सुरू राहतील.

हार्बर रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ते दुपारी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वडाळा रोड, वाशी, बेलापूर, पनवेलकरता सुटणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

माहिम ते वांद्रे दरम्यान वळणांवरील रुळांचे काम करण्यात येणार असल्याने ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत हा ब्लॉक करणार आहे. या काळात लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही फेऱ्या धीम्या आणि काही जलक मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.