घरताज्या घडामोडीSunetra Pawar and Supriya Sule : बारामतीसारखं मतदान करा तर अजितदादा..., सुनेत्रा...

Sunetra Pawar and Supriya Sule : बारामतीसारखं मतदान करा तर अजितदादा…, सुनेत्रा पवारांचं मतदारांना आवाहन

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. जागावाटपासून प्रचारालाही जोरदार सुरू आहे. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानतंर 4 जून रोजी जनतेचा कौल समजणार आहे. मात्र या सगळ्यात सध्या लोकसभेचा बारामती मतदारसंघ चर्चेत आहे.

बारामती : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. जागावाटपासून प्रचारालाही जोरदार सुरू आहे. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानतंर 4 जून रोजी जनतेचा कौल समजणार आहे. मात्र या सगळ्यात सध्या लोकसभेचा बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. कारण या मतदारसंघाची लढत ही पवार कुटुंबात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. यापार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (Sunetra Pawar and Supriya Sule people vote ajit pawar ncp baramati lok sabha 2024)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये जनतेशी संवाद साधला. त्यावेळी आपल्या भाषणात जनतेला महायुतीच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे यावेळी सगळ्या तालुक्यातील लोकांना प्रश्न पडतो की, बारामतीसारखा विकास आमच्याकडे का होत नाही? असा सवाल आप्पा (रमेश थोरात) यांनी विचारल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यावेळी त्या प्रश्नावर उत्तर देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “अजितदादांना बारामतीमध्ये जसे मतदान पडते तसे इतर तालुक्यांमध्ये पडत नाही. तुम्ही आम्हाला त्याप्रकारचे मतदान करा, मग इथेही बारामतीप्रमाणे विकास करता येईल. बारामतीमध्ये अजितदादांसमोर उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. इतर तालुक्यांमधील लोकांनीही अजित पवार यांच्यावर असाच विश्वास दाखवला तर तिकडेही तसाच विकास करता येईल”.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : हेमंत गोडसे राहिले बाजूलाच आता या दोन नेत्यांमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; वाचा सविस्तर

“तुम्ही अजित पवारांना ओळखता. त्यांची कार्यपद्धती तुम्हाला माहिती आहे. अजित पवार यांनी तुमच्या तालुक्यावर किती प्रेम केलं, किती निधी दिला, हे मी सांगायला नको. आजपर्यंतचा विकास तुमच्यासमोर आहे. नानगाव हे पूर्वीपासून सधन आहे. पुढारलेलं आहे. या गावामध्ये सगळे सुशिक्षित आणि समजुतदार आहेत. तरीही या गावात दोन गट आहेत”, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

- Advertisement -

“काही दिवसांपूर्वी महायुतीच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी जाहीर केली. या विश्वासाचे मी सोनं करेन. नानगावमध्ये शाळा आणि महाविद्यालय उभारण्याची मागणी आहे. अजितदादांनी सांगितलं आहे की, तुम्ही जागा उपलब्ध करुन दिली की, महाविद्यालायचे काम लगेच सुरु करु. दादांचे व्हिजन पुढील 50 वर्षांचे असते. शाळा आणि महाविद्यालयासाठी मैदान आणि इतर गोष्टींची गरज असते. त्यामुळे महाविद्यालय उभारण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे”, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला ठाकरेंचं वाईट करणार नाही; कोण आणि का म्हणालं हे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -