Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी NCP Anniversary : अजित पवारांना डावलल्याची भावना नाही - सुनेत्रा पवार

NCP Anniversary : अजित पवारांना डावलल्याची भावना नाही – सुनेत्रा पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रसेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर, दुसरा मोठा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीसोबतच त्यांच्यावर महाराष्ट्रातील निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु यामध्ये अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यासंबंधी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना डावलल्याची भावना नाही, असं त्या म्हणाल्या.

अजित पवारांना डावलल्याची भावना नाही

सुनेत्रा पवार या सध्या पंढरपुरात आहेत. पंढरपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात काही फेरबदल झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्या आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. अजित पवारांना डावलल्याची कोणतीही भावना नाही. त्यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करते.

पंढरपुरात उत्साहाचं वातावरण

- Advertisement -

पंढरपुरात लोकांची गर्दी वाढत चालली आहे. अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. दुष्काळाची अवस्था असूनही मोठ्या संख्येने लोकं प्रस्थानासाठी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रेमापोटी येथे गर्दी करतात. बाहेरच्या आवारात भक्तिमय वातावरण आहे. अशा वातावरणात पादुकांची पूजा देखील करण्यात आली आहे. पालखीच्या प्रस्थानाची देखील पूजा करण्यात आली आहे, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

कुणावर न्याय, अन्याय झाला असेल तर – संजय राऊत

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २५ वर्ष झाली आहेत. पण जर २५ वर्षानंतर नवीन घडामोडी घडत असतील आणि नवीन जबाबदारी पवारांनी कुणावर दिली असेल. तर आम्ही त्यावर काय बोलावं? शरद पवार हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी नवीन नियुक्त्या आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सव साजरा होतोय, त्याला आमच्याकडून शुभेच्छा, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्ष आहे. परंतु त्यांच्या अंतर्गत पक्षातील घडामोडींवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. कुणावर जर न्याय, अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती स्वत:हून बोलेल. त्यामध्ये बाहेरच्यांही का बोलावं? त्यांचं वकीलपत्र त्यांनी कुणाला दिलंय का? हे मला माहिती नाही. पण शरद पवार कोणताही निर्णय घेण्यात समर्थ आहेत, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : कुणावर न्याय, अन्याय झाला असेल तर… राऊतांचं अजित पवारांबाबत मोठं


 

- Advertisment -