कोणालाही वाटलं नाही की महायुतीचं सरकारचं वादळ एवढ्या जोरात येईल की महाविकास आघाडी भुईसपाट होईल. महायुतील तब्बल 232 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करण्यात येत आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी मला निकाल मान्य नसल्याचं सांगत मतांची गणिते सांगितली आहेत.
विक्रमगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार, सुनील भुसारा विरुद्ध भाजपचे हरिश्चंद्र भोये यांच्यात थेट निवडणूक झाली. भोये यांनी भुसारा यांचा 41 हजार मतांनी पराभव केला. भोये यांना 1 लाख 14 हजार 514 मते, तर भुसारा यांना 73 हजार 106 मते मिळाली. पण, सगळे उलटे झाले आहे, अशी प्रतिक्रिया सुनील भुसारा यांनी दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
सुनील भुसारा म्हणाले, “मला विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही. लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांना 72 हजार 500 मते मिळाली होती. मला 73 हजार 106 मते मिळाली आहेत. एवढा फरक आहे. बहुजन विकास आघाडीनं मला पाठिंबा दिला होता. बहुजन विकास आघाडीची 22 हजार मते तिथे आहेत. 73 हजार आणि बहुजन विकास आघाडीची 22 हजार, अशी 95 हजार मते आमच्याकडे होती. मी केलेलं काम, जनसंपर्क आणि माझ्या मतदारसंघातील अस्तित्त्वाच्या जोरावर मला एका लाख मते मिळाली पाहिजे होती.”
“लोकसभेला भाजपला 1 लाख सहा हजार मते मिळाली होती. आता विधानसभेला मनसेला त्यातील सहा हजार मते मिळाली. उरली एक लाख मते. प्रकाश निकम हे बंडखोर उमेदवार होते यांना 32 हजार मते मिळाली. 70 हजार मते विरोधी उमेदवाराला मिळाली पाहिजे होती. एक लाख 10 हजार मते मला मिळाली पाहिजे. मात्र, सगळं उलट झालं आहे,” असं सुनील भुसारा यांनी म्हटलं.
“एक लाख 10 हजार त्यांना आणि मला 71 हजार मते मिळाली. माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणीचा फॅक्टर नाही आहे. वृद्धांच्या पेन्शनचा मुद्दा आमच्याकडे आहे. खावटीची योजना आम्ही उद्धव ठाकरे यांच्या काळात दिली होती. ती बंद केल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे. मागीलवेळी पेक्षा यंदा जास्त उस्हा होते. तरीसुद्धा हा निकाल आला. हा निकाल अनपेक्षित आहे. ती बंद केल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे. 2019 पेक्षा यंदा जास्त उत्साह होता. तरीसुद्धा हा निकाल आला. हा निकाल अनपेक्षित आहे,” असं भुसारा यांनी सांगितलं.
हेही वाचा : नरेश अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं अमोल मिटकरी भडकले; म्हणाले, “हा महाराष्ट्र…”