घरदेश-विदेशपीएमसी बँकेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

पीएमसी बँकेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Subscribe

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिर्झव्ह बँकेने आलेले निर्बंधाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्याचे मान्य केले असून येत्या गुरुवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्यावर बँकेेचे सुमारे १५ खातेधारक संकटात आले. त्यांचे पैसे बँकेत अडकले. खातेधारकांना त्यांचे पैसे काढता येईनात त्याविरोधात बँकेच्या खातेधारकांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याचे कोर्टाने मान्य केले आहे. ही सुनावणी गुरुवारी होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईच्या सत्र न्यायालयाबाहेर पीएमसी बँकेच्या १०० पेक्षा जास्त खातेधारकांनी आंदोलन केले. आम्हाला न्याय मिळावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काही वरिष्ठ नागरिक खातेधारकांनी कोर्टाच्या बाहेरील रस्त्यावर ठाण मारले होते. इतर आंदोलकांनी कोर्टाच्या बाहेर जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलकांना शांत केले. तसेच पीएमसी बँकेत केलेल्या घोटाळ्याबद्दल कोणालाही सोडणार नाही. आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना शिक्षा होईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

पीएमसी बँकेच्या खातेदार एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. योगिता बिजलानी असे या महिलेचे नाव आहे. बिजलानी यांची पीएमसी बँकेच्या खात्यात १ कोटींची रक्कम आहे.

- Advertisement -

अंधेरी येथील वर्सोवा परिसरात राहणार्‍या डॉ. बिजलानी यांनी राहत्या घरी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता बिजलानी या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, बिजलानी यांच्या आत्महत्येशी बँक घोटाळ्याचा काही संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करुन घेतली आहे.

अजून एका संचालकाला अटक
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बँकेचे माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांना अटक केली. या घोटाळ्यातील ही पाचवी अटक असून बँकेचे आणखी ११ संचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने बुधवारी सुरजितसिंग अरोरा यांची पोलीस मुख्यालयात कसून चौकशी केली. या चौकशीनंतर अरोरा यांना अटक करण्यात आली आहे. अरोरा हे पीएमसी बँकेचे संचालक होते तसेच कर्ज मंजुरी व वितरण समितीतही त्यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -