घरताज्या घडामोडीशिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी

शिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी

Subscribe

शिवसेना कुणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची याचा निकाल आज लागणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या अशा सर्वच याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

शिवसेना कुणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची याचा निकाल आज लागणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या अशा सर्वच याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिंदे गटाचे विशेष लक्ष असणार आहे. कारण शिवसेनेने बंडखोर १६ आमदार अपात्र असल्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरन्यायाधीश रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. मागील महिनाभरापासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचा आज निकाल लागणार आहे. (supreme court will hear on pil filed by shivsena and ekanth shinde group)

- Advertisement -

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. त्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास ५० आमदारांनी बंड पुकारच महाविकास आघाडीतून बाहेर पडत, भाजपासोबत युती करण्याची मागणी केली होती. परंतु, बंडखोर आमदारांच्या या मागणीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्नक प्रतिसाद न देता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे. उद्धव यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करून शिंदे गटाने स्वत: ची कार्यकारणी स्थापन केली आहे. मंगळवार १९ जुलै रोजी लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांना हटवून राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले.

- Advertisement -

आमदारांनंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटात सहभाग घेतला. लोकसभा अध्यक्षांनी या पत्राला मंजुरी देत हे राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. तर, शिवसेनेच्या प्रतोदपदी भावना गवळी यांना कायम ठेवण्यात आले आहे. शिवसेनेने राजन विचारे यांना प्रतोद म्हणून नेमले होते.

‘या’ याचिकांवर होणार सुनावणी

  • १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचं आव्हान
  • एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान
  • विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका
  • विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान
  • एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान
  • एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, शिंदे गटातील राहुल शेवाळेंना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -