Homeताज्या घडामोडीSupriya Sule: मी सरकारमध्ये असते तर कधीच राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळे...

Supriya Sule: मी सरकारमध्ये असते तर कधीच राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या

Subscribe

इंदापूर (पुणे) – राज्यात 400 कोटींचा पीकविमा घाटाळा झाला असल्याचे राज्याचे कृषीमंत्रीच कबूल करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात 400 कोटींचा नाही तर 5000 कोटींचा घोटाळा झाला आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे. माजी कृषिमंत्र्यांवर फक्त एक नाही तर चार आरोप झाले आहेत. मी जर सरकारमध्ये असते तर तत्काळ राजीनामा दिला असता, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कार्याध्यक्ष तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता. त्यातील 60 दिवस मंत्रीमंडळ विस्तार, खाते वाटप, पालकमंत्रीपद यातील वादातच गेले आहेत. आता 40 दिवस उरले, त्यात काय होते ते पाहायचे आहे, असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.

खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते आज प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील वडापुरी, वनगळी आणि न्हावी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी तिन्ही ठिकाणी संबंधीत खात्याचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते, यावरुन खासदार सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते आज प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील वडापुरी, वनगळी आणि न्हावी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी तिन्ही ठिकाणी संबंधीत खात्याचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. यावरुनही खासदार सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संबंधी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहून सुप्रिया सुळे यांनी संबंधीत खात्याच्या प्रमुखांनी जाब विचारला पाहिजे असे म्हटले आहे.

माणिकराव कोकाटेंच्या आरोपांची माहिती केंद्र सरकारला देणार – खासदार सुळे 

खासदार सुप्रिया सुळे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा घोटाळ्यावर केलेल्या वक्तव्यावरुन सरकारला घेरले आहे. मंत्री कोकाटे यांनी 400 कोटींचा पीकविमा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी कोकाटे यांचा घोटाळ्याचा आकडा दुरुस्त करत 5000 कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. हा गंभीर मुद्दा आहे. यावर संसदेच्या आगामी अधिवेशनात प्रश्न विचारणार असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

कृषीमंत्री कोकाटे यांनी दुसरा एक दावा केला, तो देखील गंभीर असल्याचे सांगत खासदार सुळे म्हणाल्या, कृषीमंत्री म्हणाले, अनेक गोष्टी आम्हाला राज्यात राबवायच्या आहे, मात्र केंद्र सराकर आम्हाला पैसा देत नाही. त्यामुळे आम्ही काहीही करु शकत नाही. हा केंद्र सरकारवर राज्य सरकारने केलेला आरोप आहे. याबद्दलही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

कृषीमंत्री कोकाटे यांनी पीकविमा घोटाळ्यावर बोलताना प्रत्येक योजनेत, विभागात चार ते पाच टक्के भ्रष्टाचार होतोच असतो, असे म्हटले आहे. त्याचीही गंभीर दखल विरोधकांनी घेतली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यांच्या या संकल्पाला आम्ही विरोधात असलो तरी पाठिंबा दिला आहे. मात्र राज्य सरकारच भ्रष्टाचाराची कबुली देत आहे. चार ते पाच टक्के भ्रष्टाचार प्रत्येक खात्यात होतो, हा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडून प्रत्येक हर्वेस्टरसाठी सरकारने आठ लाख रुपये मागितल्याची माहिती आहे. या चारही आरोपांची कबुली महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनीच दिली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. राज्याच्या कृषीखात्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्याची कबुली कृषीमंत्रीच देत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असे धनंजय मुंडे यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे म्हणाल्या.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर ऐकीव बातमीवर आरोप झाले होते, त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. केंद्र सरकारच्या यंत्रणांनी ऐकीव माहितीवर तत्कालीन गृहमंत्र्यांवर कारवाई केली होती. आता सरकारमधील मंत्रीच भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशी एक नाही तर चार प्रकरणे कृषीमंत्र्यांनी समोर आणली आहेत.
मी जर सरकारमध्ये असते तर मीच राजीनामा दिला असता, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे चारही मुद्दे संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Congress Vs Mahayuti : दिखावा हा महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग, सचिन सावंत यांची टीका