तुमचे मंत्री सर्वसामान्यांना धमक्या देताहेत त्यांना तुम्ही आवरणार की नाही?, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल

ncp supriya sule

राज्यातील मंत्री धमक्या देत आहेत. राज्यातील नागरिक आणि महिला म्हणून मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करते. तुमचे मंत्री सर्वसामान्यांना धमक्या देताहेत त्यांना तुम्ही आवरणार की नाही?, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात मेरिटवर आलेले मोठे प्रकल्प इतरत्र जात आहेत. परराज्यात जाणाऱ्या या प्रकल्पांना काही मंत्रीच भेट देणार असल्याचे कळते आहे. मेरिटवर आलेले प्रकल्प बाहेर जात असल्याचे मोठे दुःख आहे. असंही सुळे म्हणाल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या तीन दिवसीय दौऱ्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा केला जात असल्याची टीका होत असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, राजकारणात आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी १३ वर्षे खासदार आहे. किती दौरे केले याची माहिती सगळ्यांना आहे. विरोधकांना किमान माझ्यावर टीका करण्यासाठी काही मिळत आहे. ते त्यांना करू द्या, असं सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर.., मंगलप्रभात लोढांनी दिलं स्पष्टीकरण