घरदेश-विदेशप्रधानमंत्रीजी मै आपसे नाराज नही, हैराण हूं, आत्मचिंतन करा, खासदार सुळेंचा मोदींना...

प्रधानमंत्रीजी मै आपसे नाराज नही, हैराण हूं, आत्मचिंतन करा, खासदार सुळेंचा मोदींना सल्ला

Subscribe

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही पंतप्रधानांचं भाषण खूप अपेक्षेनं पाहत होतो आणि ऐकत होतो. महाराष्ट्राबद्दल जे पंतप्रधान मोदी बोलले ते मला स्वतःला दुःख देणारं आहे. मला प्रचंड वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का बोलत आहेत. ज्या राज्यानं फूल ना फुलाची पाकळी म्हणा 18 खासदार या राज्याने निवडून दिले. मोदी पंतप्रधान आहेत, त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील खासदार आणि मतदारांचाही आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा काल कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला.

नवी दिल्लीः मला एक फोटो कोणी तरी पाठवला होता. त्यात एक बॅग होती, त्याच्यावर मूल झोपलं होतं आणि वडील ती बॅग खेचत होते. त्याखाली एक टॅगलाईन होती तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू मै, मला पंतप्रधानांना हाच प्रश्न विचारायचा आहे. प्रधानमंत्रीजी मै आपसे नाराज नही, हैराण हू मै आपसे, तुम्ही आमच्या महाराष्ट्राबद्दल आणि आम्ही लोक सुपरस्प्रेडर आहोत असं कसं बोललात, त्याला वैज्ञानिक आधारही नाहीये. महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही आणि झुकणार नाही, असंही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मोदींना उद्देशून म्हणाल्यात. सुप्रिया सुळे दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या, त्यावेळी त्यांनी मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केलीय.

त्या पुढे म्हणाल्या, खरं तर कालचं दीड तासाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं, खूप अपेक्षेनं मी त्याकडे पाहत होते. अडचणीच्या काळातून देश चाललाय, हळूहळू आपणच नाही, तर पूर्ण जग त्यातून बाहेर पडतोय. त्यामुळे पंतप्रधानांनी राज्यांना दिशा द्यावी, जीएसटीच्या नवी टप्प्यावर आपण उभे आहोत. राज्य अडचणीत आहे, कोविड तिसरी लाट आता ओसरतेय, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे. नोकऱ्यांचं फार मोठं आव्हान आहे. आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या उत्पन्न होत नाहीयेत, असा केंद्र सरकारचाच डेटा सांगतोय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

- Advertisement -

आम्ही पंतप्रधानांचं भाषण खूप अपेक्षेनं पाहत होतो आणि ऐकत होतो. महाराष्ट्राबद्दल जे पंतप्रधान मोदी बोलले ते मला स्वतःला दुःख देणारं आहे. मला प्रचंड वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का बोलत आहेत. ज्या राज्यानं फूल ना फुलाची पाकळी म्हणा 18 खासदार या राज्याने निवडून दिले. मोदी पंतप्रधान आहेत, त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील खासदार आणि मतदारांचाही आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा काल कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे खूप धक्कादायक आहे. आणि खूप दुर्दैवी आहे. ते भाजपचे पंतप्रधान नाही आहेत. ते तुमचे आणि माझे सगळ्यांचे पंतप्रधान आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि एका पक्षाच्या वतीनं ते बोलतात आणि एक राज्याच्या वतीनं एक प्रधानमंत्री बोलतो, त्याचं मला भयंकर दुःख झालं. एकदा निवडून आले की ते आपले प्रधानमंत्री होतात. त्यांचा मान-सन्मान हा आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. त्याच्यात पक्ष येतच नाही. ती पोस्ट पक्षाची नाहीये. पंतप्रधान हे देशाचे असतात. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणखी ते दुःखदायक होते, असंही सुप्रिया सुळेंनी अधोरेखित केलेय.

श्रमिक ट्रेनचा आढावा हा गव्हर्नमेंट ऑफ रेल्वेचा कागद आहे, महाराष्ट्र सरकारचा कागद नाही. गुजरात राज्यातून 1033 ट्रेन गेल्या. महाराष्ट्रातून 817, पंजाब 400 आणि सगळ्या राज्यांची माहिती दिली आहे. त्यात इनकमिंग आणि आऊटगोईंग सर्व माहिती आहे. ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही चालवत तर ती केंद्र सरकार चालवते. केंद्र सरकार ठरवतं कुठली ट्रेन कुठून जाणार आहे. किती वाजता जाणार, कशी जाणार आहे. मोदी म्हणतात महाराष्ट्रानं लोकांना पाठवलं, पण आमच्याकडे ट्रेन नाहीच आहे. आम्ही कुठून ट्रेन देणार आम्ही एसटी देऊ शकतो. आम्ही गाडी देऊ शकतो, आम्ही टेम्पो करू शकतो. आम्ही ट्रक करू शकतो पण रेल्वे नाही करू शकत. पंतप्रधानांनी आपल्या महाराष्ट्राबद्दल असं वक्तव्य केल्यानं मला प्रचंड दुःख होतंय, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

पीयूष गोयल यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून ट्विट केलेत. देवेंद्र फडणवीस आणि पीयूष गोयलही आपल्या महाराष्ट्राचे आहेत. योगी माझ्याबरोबर अनेक वर्ष खासदार होते. माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहे. आम्ही संसदेत अनेक वर्ष एकत्र काम केलंय. जरी आम्ही विरोधात असलो तरी राजकारणात ज्याला चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणण्याची पद्धत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ट्रेनची लिस्ट केंद्र सरकारची, पीयूष गोयल बोलले हे त्यांचे ट्विट्स आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पीयूष गोयलांचे आभार मानले हे त्यांचे ट्विट आहेत. हरिश द्विवेदी यांनीसुद्धा श्रमिकांना मोदीजींनी कसं घरी व्यवस्थित पोहोचवलं याच्याबद्दल लिहिलंय. या महामारीत आपण माणुसकी विसरलोय.दुर्दैव पंतप्रधानांनी दोनच राज्य घेतली, एक पंजाब आणि दुसरं उत्तर प्रदेश बाकीच्यांबद्दल त्यांनी काही उल्लेखच केला नाही. राज्याराज्यांमध्ये मोदी द्वेष का पसरवत आहेत. कोरोनाचे सुपर स्प्रेडर कोण आहेत, मोदीजी आत्मचिंतन करा. कोरोना काळात अनेक लोक आणि कुटुंब, श्रमिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले असतील त्यांच्या खाण्याचा, औषध आणि ब्रेडसाठी अनेक खासदारांनी एकमेकांकडे मदत मागितलीय. तसेच ट्विटर आणि समोरासमोर ऑफिशिअली आम्ही आभार मानले. या कोविडच्या काळात अनोळखी लोकांनी एकमेकांना धावून जात मदत केल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय.


हेही वाचाः हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान, संजय राऊतांचा मोदींवर पलटवार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -