बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक स्वाभिमानी होते पण.., सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

supriya sule

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते. त्यांमध्ये आता काय नवीन बदल झालाय मला काही समजेना, असा टोला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक स्वाभिमानी होते पण…

मुंबईतील एका कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी काल हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बंड पुकारल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा अनेकदा उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सुप्रिया सुळे यांनीही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा दाखला दिला. मला हे कौतुक वाटतं कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते. त्यांच्यामध्ये काय नवीन बदल झालाय मला काही समजेना, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका

सुप्रिया सुळेंनी माईक खेचल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. आताचे सगळे निर्णय पाहिले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारुन सगळे निर्णय घेतायत. सुपर सीएम झालेत का ते?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला त्यादिवशीच ते लक्षात आलं होतं, असं सुळे म्हणाल्या.

बुलेट ट्रेनची मागणी कोणीही करत नाहीये

महाराष्ट्र आणि मुंबईचे अनेक मह्त्वाचे विषय दुसऱ्या राज्यांमध्ये नेण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाला सुरूवात करायची असेल तर जरुर करावी पण त्याआधी मुंबईच्या लोकल ट्रेन सुधारल्या पाहिजेत. बुलेट ट्रेनची मागणी कोणीही करत नाहीये. त्याऐवजी जे मुंबईकर मागतायत त्याला आधी निधी द्यावा, असं सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : … तर वेळ पडल्यास पवारांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन: केसरकरांची भूमिका