घरमहाराष्ट्रSupriya Sule : कॅबिनेट भुजबळांचे ऐकत नाही हे दुर्दैव, सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

Supriya Sule : कॅबिनेट भुजबळांचे ऐकत नाही हे दुर्दैव, सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परंतु, यामुळे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून देखील कॅबिनेट त्यांचे काहीही ऐकत नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule criticizes government as the cabinet is not listening to Chhagan Bhujbal)

हेही वाचा… Maratha Vs OBC : ओबीसी नेते आक्रमक; जरांगेंना कोर्टात खेचण्याची भाषा

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (ता. 30 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळ यांना सरकारकडून डावलण्यात येत आहे का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले की, छगन भुजबळ यांचा हा खरे तर अपमान आहे. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे त्यांच्या कॅबिनेटमध्ये ऐकले जात नाही, हे दुर्दैव आहे. अनेकवेळा संजय राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही. पण राऊत म्हणतात त्याप्रमाणे एक गँग वॉर सुरू आहे, या कॅबिनेटमध्ये. कदाचित आमचे ज्येष्ठ ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम, आदर, विश्वास आहे. ते जवळपास माझ्या वडिलांच्या (शरद पवार) वयाचे आहेत. अशा छगन भुजबळांवर हा अन्याय होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचे अंतर्गत काय आहे ते माहीत नाही. पण भुजबळांना सातत्याने कॅबिनेटमध्ये ज्या गोष्टी मांडता येत नाही. त्या गोष्टी त्यांना कॅमरासमोर मांडाव्या लागत आहेत. यातच या ट्रिपल इंजिन खोके सरकारचे अपयश आहे, अशी सडकून टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे.

यावेळी त्यांनी इतर जातींच्या आरक्षणाबाबत मत व्यक्त करत म्हटले की, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही पूर्ण ताकदीने आहोत. आमचे सरकार आता आले तर आम्ही लगेच ते निर्णय घेऊ. आता जे केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आहे, त्या दोन्ही सरकारांनी जर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी केली तर आम्ही पूर्ण ताकदीने जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी त्याच्या बाजूने मतदान करू आणि या चारही जातींच्या आरक्षणाला पाठिंबा देऊ, असे स्पष्टपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -