घरमहाराष्ट्रSupriya Sule : "वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?" ताईंचे दादांना भावनिक आवाहन

Supriya Sule : “वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?” ताईंचे दादांना भावनिक आवाहन

Subscribe

बारामती : राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी (11 फेब्रुवारी) पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांना यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.  (Supriya Sule Ajit Pawar Does anyone take father out of the house Emotional appeal of Tai to Dada)

हेही वाचा – Rajya Sabha : भाजपाकडून राज्यसभेचे 14 उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातून कोण?

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला होता. मात्र तो पक्ष चुकीच्या पद्धतीने घेतला गेला आहे. तसंच उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला गेला आहे. “स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. याचवेळी त्यांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, देशात लोकशाही आहे. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे, मात्र तो दिलदार असला पाहिजे. मात्र लोकांना दम देणं या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

हेही वाचा – Rajan Salvi : राजन साळवी यांची स्वत:साठी नाहीतर कुटुंबीयांसाठी उच्च न्यायालयात धाव; ‘हे’ आहे कारण

- Advertisement -

आपल्यावर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे संस्कार

अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनासाठी 14 वर्षांच्या वनवासाला गेले. आपल्यावर मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आहेत, हे स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, आज ते (अजित पवार गट) आपला पक्षही घेऊन गेले आणि चिन्हही घेऊन गेले. त्यामुळे लोक विचारत आहेत की, नवं चिन्ह लोकापर्यंत कसं पोहचवणार? मात्र काळजी करू नका, चिन्ह आपण नक्कीच पोहचवू. आपण नव्याने पक्ष उभा करू आणि नवीन चिन्ह घेऊन नव्या जोमाने उभे राहू. आमची सगळ्यात मोठी ताकद इमानदारी आहे. त्यामुळे ते (अजित पवार गट) सगळं घेऊन जातील, पण इमानदारी कशी काय नेतील? असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -