घरमहाराष्ट्रताई काळजी घ्या.. डेंग्यू झालेल्या सुप्रिया सुळेंना कार्यकर्त्यांचे आर्जव

ताई काळजी घ्या.. डेंग्यू झालेल्या सुप्रिया सुळेंना कार्यकर्त्यांचे आर्जव

Subscribe

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डेंग्यू झाला आहे. त्यांनी या संदर्भात खंत व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखांच बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग दिसून येत आहे. प्रत्येक पक्ष हा विधानसभेच्या निवडणूकीकरता सज्ज झाले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सज्ज झाली आहे. मात्र, विधानसभेला अवघा एक महिना राहिला असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या बेड रेस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर याबाबत माहिती दिली आहे. यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताई काळजी घ्या अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

विधानसभा निवडणुकीची घोषणा करता सर्वच पक्षांकडून प्रचाराकरता जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, ऐन प्रचाराच्या वेळीच सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे प्रचारात सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी सज्ज असताना डेंग्यूची लागण झाल्याबद्दल त्यांनी खंत देखील व्यक्त केली.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

‘ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु, डासांचा उच्छाद अखेर भोवला! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे’.

दरम्यान, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या असून त्यांनी महिला संघटनासोबतच राज्यात अनेक विषयांवर नेतृत्व केले आहे. अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई मेट्रो कारशेडच्या विषयातही विरोध करत त्याबद्दल ठाम भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी आरे संदर्भात मुख्य भूमिका घेत वृक्षतोडीबाबत माहिती घेण्यासाठी त्या स्वत: घटनास्थळी जाऊन त्यांनी आरे विरोधात आंदोलन देखील केले होते.


हेही वाचा – मंदा म्हात्रेंचा पत्ता कट; बेलापूर मतदारसंघात गणेश नाईकांना भाजपचा हिरवा कंदील


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -