इंदापूर : राज्यातील सरकार कबुली देत आहे की 400 कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणत आहेत की 400 नव्हे तर 5 हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे. स्वतः भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. इंदापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती प्रचंड अस्वस्थ करणारी आहे, असे म्हणत चिंता सुद्धा व्यक्त केली आहे. (Supriya Sule expressed concern about the current situation in Maharashtra)
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होत आहे. हे महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री कबूल करत आहेत. मग त्याची चौकशी का होत नाही? हे मी पार्लमेंट सेशनमध्ये मांडणार. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला दिल्लीला पाठवले आहे. त्यामुळे काळ्या मातीशी इमान राखणे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. संसदेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी न्याय मागणार. या अधिवेशनानंतर महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही याबाबत जर पत्रकारच अस्वस्थ होऊन विचारत असतील तर त्यांच्या प्रश्नातच माझे उत्तर आहे. लोकांची भावना आहे की महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली नाही. हे अतिशय चिंताजनक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही. सरकारला दोन महिने झाले. ते 100 दिवसांचा प्रोग्राम देणार होते, आज 60 दिवस झाले आहेत. इंदापूरवर अन्याय झाला आहे. पालकमंत्रीपद दिले नाही. मी सरकारला बोलणार आहे. सरकार स्थापन होऊन 60 दिवस झाले तरी कोणतेच काम झाले नाही, असा हल्लाबोल यावेळी सुप्रिया सुळेंनी केला.
हेही वाचा… Supriya Sule: मी सरकारमध्ये असते तर कधीच राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या
तसेच, निधी नसल्यामुळे निरा भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प आहे. निधी का मिळत नाही? निधी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा डीपी बसवला जात नाही. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला अनेक कारणं आहे. उत्तम जानकर निवडून आले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मला निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न पडला आहे. लोक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. माझे म्हणणे आहे की, समाजामध्ये जर अस्वस्थता असेल आणि जर लोकांची मागणी असेल की निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. यात अडचण काय? असा प्रश्न यावेळी खासदार सुळेंनी उपस्थित केला. तर, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, अंजली दमानिया, नमिता मुंडदा हे लोक आणि काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीक कराडला 302 मध्ये आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत. राज्यातील 6 पक्ष सातत्याने मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. सरकार खुनी लोकांना का लपवत आहे? असा सवाल उपस्थित कराड सुळेंनी वाल्मीक कराडच्या मुद्द्यावरून सरकारला सुनावले आहे.