घरताज्या घडामोडीSupriya Sule : विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार; सुप्रिया सुळेंचा रोख कोणावर?

Supriya Sule : विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार; सुप्रिया सुळेंचा रोख कोणावर?

Subscribe

हे इंदापूर आहे. इथे शरद पवारांवर प्रेम करणारी लोकं इतकी आहेत की, ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत. तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. कारण आता कार्यक्रम इथे नाही तर, विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, असे म्हणत नाव न घेता आमदार दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला.

पुणे : हे इंदापूर आहे. इथे शरद पवारांवर प्रेम करणारी लोकं इतकी आहेत की, ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत. तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. कारण आता कार्यक्रम इथे नाही तर, विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, असे म्हणत नाव न घेता आमदार दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला. (supriya sule indapur baramati lok sabha constituency bjp and dattatray bharane loksabha election 2024)

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. दरम्यान, आज (23 मार्च) बारामतीतील इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. “इंदापूरमध्ये शरद पवार यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. हा तालुका शरद पवार यांच्याववर खूप प्रेम करतो. या इंदापुरात काही राजकीय बदल झाले. या निवडणुकीत काय झालंय काही समजत नाही. मी तीन निवडणुका लढवल्या. मागच्या निवडणुकीत माझ्याविरोधात राहुल कुल यांच संपूर्ण कुटुंब होतं. मी राहुल कुल आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करते की त्यांनी कधीही पातळी सोडून टीका केली नाही. तिन्ही निवडणुका सुसंस्कृत होत्या”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

“रोहित पवार, युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत. ते आजोबा शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत. युगेंद्र पवार यांचा दोन वेळा रस्ता अडवण्यात आला. ते लोकशाही पद्धतीने शांततेने प्रचार करत आहेत. मी युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर माझ्यावरही टीका झाली”, असेही सुप्रिया सुळे यावेली म्हणाल्या. तसेच, कुठल्याही मुलावर हल्ला झाल्यावर त्या आईचा कोणी विचार करणार की नाही? टीका करताना पातळी सोडली जात आहे. हे काय संस्कार आहेत का? असे सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधला.

“सध्या दमदाटी केली जात आहे. पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, असे सांगितले जात आहे. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण त्यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे”, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांना इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -