घरमनोरंजनहसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला... सुप्रिया सुळेंकडून प्रदीप पटवर्धनांच्या निधनावर शोक व्यक्त

हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला… सुप्रिया सुळेंकडून प्रदीप पटवर्धनांच्या निधनावर शोक व्यक्त

Subscribe

प्रदीप पटवर्धन यांच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. फक्त मनोरंजनसृष्टीतूनच नाही तर राजकीय क्षेत्रातून देखील प्रदीप पटवर्धांनाच्या निधनावर दुःख व्यक्त केला जात आहे.

मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गिरगाव येथील राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात मराठी नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. मात्र प्रदीप पटवर्धन यांच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. फक्त मनोरंजनसृष्टीतूनच नाही तर राजकीय क्षेत्रातून देखील प्रदीप पटवर्धांनाच्या निधनावर दुःख व्यक्त केला जात आहे.

नुकत्याचं काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप पटवर्धनांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्वीट केले होते, दरम्यान आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केले आहे.

- Advertisement -

आपल्या ट्विटर अकाऊंटवर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय की,”ज्येष्ठ अभिनेते प्रदिप पटवर्धन यांच्या निधनामुळे रंगभूमीवरील एक हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी ‘मोरुची मावशी’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,गोळा बेरीज अशा अनेक चित्रपटांतून देखील भूमिका साकारल्या.त्यांच्या या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणार राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.” असं भावनिक ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मोरूची मावशी नाटकामुळे मिळाली प्रसिद्धी
मोरूची मावशी हे त्यांचे प्रचंड गाजलेले नाटक. या नाटकामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. एक विनोदी अभिनेते म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जायचे. विनोदाचे टायमिंग व हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप निर्माण केली होती. मराठीतील मालिका आणि चित्रपटातही वेगवेगळ्या धाटणीच्या उत्तम भूमिका साकारल्या. त्यासोबतच अनेक दर्जेदार नाटकातही त्यांनी अभिनय केला.


हेही वाचा :हास्य जगताचा बादशहा हरपला! प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून शोक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -