Homeमहाराष्ट्रSule Vs Pawar : मुंडेंवरून जुंपली! अजितदादा म्हणाले, 'फुकट सल्ला देऊ नये';...

Sule Vs Pawar : मुंडेंवरून जुंपली! अजितदादा म्हणाले, ‘फुकट सल्ला देऊ नये’; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Subscribe

Supriya Sule : ओडिशा, छत्तीसगडसारखी राज्ये आर्थिक आणि समाजिक परिस्थितीत महाराष्ट्रापेक्षा पुढे गेली आहेत, असं म्हणत सुळेंनी महायुतीवर टीका केली आहे.

मुंबई : राज्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत घसरण झाली आहे, असं नीती आयोगाने म्हटलं आहे. निर्यात करण्यामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागे आहे. ओडिशा, छत्तीसगडसारखी राज्ये आर्थिक आणि समाजिक परिस्थितीत महाराष्ट्रापेक्षा पुढे गेली आहेत. महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत एक नंबर होता. पण, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे का जातोय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

“महाराष्ट्र व्यवस्थितरित्या टॅक्स भरतो. देशात रेकॉर्डब्रेक ‘जीएसटी’ महाराष्ट्र देतो. काँग्रेसच्या काळात अनेक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. मग आता राज्याची परिस्थिती अडचणीत आली आहे. देशात महाराष्ट्राची पत खाली जात आहे. हे तीन वर्षे मी सातत्याने बोलत आले आहे. यावर नीती आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी याबद्दल प्रश्न मांडणार आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘ते’ विधान भोवणार? विखेंविरोधात ठाकरेंच्या नेत्याची उच्च न्यायालयात धाव

‘सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेत नाहीत,’ अशी टीका विरोधकांनी केली होती. याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधकांना सुनावलं होते. ‘आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. बाकींनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही,’ असं अजितदादांनी म्हटलं होते.

अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडेंचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. सोनिया गांधी खासदार असताना त्यांच्यावर ऑफिस ऑफ प्रोफिटचे ( लाभाचे पद ) आरोप केले होते. त्या मंत्री सुद्धा नव्हत्या. तरी सोनिया गांधी यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. अजितदादा पवार यांचा स्वत:चा पक्ष म्हणतोय धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. नैतिकतेच्या आधारे आम्ही राजीनामा मागत आहे. पुरावे तर सगळेच देत आहेत,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

“अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना ऐकीव माहितीवर अटक झाली होती. एक-एक वर्षे ते तुरूंगात राहिले आहेत. मुंडे प्रकरणात तर सगळी कागदपत्रे आहेत. सत्तेतील तीनही पक्षातील लोक धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत,” असं सुप्रिया सुळे सांगितलं.

हेही वाचा : ‘मी तुतारीवाला नुसता नावाला, खरा तर मी…’, शरद पवारांच्या आमदाराकडून पक्ष बदलाचे संकेत?