मटण खाऊन देवदर्शन केल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी उत्तर देणं टाळलं

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे सध्या एका नव्या वादात अडकल्या आहेत. त्यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

Supriya-Sule-On-Allegations
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे सध्या एका नव्या वादात अडकल्या आहेत. त्यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे सध्या एका नव्या वादात अडकल्या आहेत. त्यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळेंनी उत्तर देणं टाळलं. उलट त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या ९ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. भारत अजूनही लोकशाही देश असल्याच्या मतांशी तुम्ही सहमत असाल अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावरून असं दिसत आहे की, आपण लोकशाहीतून निरंकुशतेकडे वाटचाल करत आहोत, असं या पत्रात लिहिण्यात आलंय. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात काय परिस्थिती आहे यावर चर्चा झाली पाहिजे. पुढच्या आठवड्यात पार्लमेंट सुरू होत आहे. पार्लमेंटमध्ये बेरोजगारी आणि महागाईवर चर्चा व्हायला पाहिजे”. यावेळी सुप्रिया सुळेंनी कांद्यावरून सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘कांद्याला महाराष्ट्रात भाव नाही, पण जगात भाव आहे. त्यामुळे यावर एकत्र येऊन काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता, यावरून केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरतंय हे दिसतंय.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा आरोप केलाय. देवदर्शन घेतानाचे त्यांचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. यावर जेव्हा पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना सवाल केला, त्यावेळी मात्र सुप्रिया सुळे अनुत्तरीतच राहिल्या. यावर त्यांनी बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. “माझ्या वाचनात असं काही नाही आलं. मी सकाळपासून या परिसरातल्या पाण्याच्या प्रश्नात आहे. त्यामुळे ते काय बोलले मला माहिती नाही.” असं बोलून सुप्रिया सुळेंनी या आरोपावर बोलणंच टाळलं.