घरताज्या घडामोडीखिडकीतली जागा बदलून वर्गातील मध्यभागी बसवायला हवं.., फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुळेंचा टोला

खिडकीतली जागा बदलून वर्गातील मध्यभागी बसवायला हवं.., फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुळेंचा टोला

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सहा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. असं असूनही गप्पागोष्टी करण्यात त्यांना वेळ कसा काय मिळतो?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

शाळेत काही विद्यार्थी असतात. ज्यांचं लक्ष सातत्याने खिडकीच्या बाहेर असतं. पण अभ्यासात सहाही विषयात ते नापास होतात. अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. त्यांची खिडकीतली जागा बदलून वर्गातील मध्यभागी बसवायला हवं. कारण शाळेत काही नॉटी मुलं असतात, त्यांचं खिडकीतून बाहेर लक्ष जाऊ नये म्हणून शिक्षक त्यांची जागा बदलतात, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

फडणवीसांना शरद पवाराचा सहारा असा प्रश्न विचारल्यानंतर सुळे म्हणाल्या की, तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे, असं सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : बीबीसीवरील प्राप्तिकराच्या धाडीवर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, ‘आम्ही मुक्त पत्रकारितेच्या’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -