Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSupriya Sule : तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती...सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत

Supriya Sule : तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती…सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत

Subscribe

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तावडेंसारख्या सुसंस्कृत राजकीय व्यक्तीकडून अशी अपेक्षा नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच राज्यातील विविध भागांमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. विरारमधील विवांता हॉटेलमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तावडेंसारख्या सुसंस्कृत राजकीय व्यक्तीकडून अशी अपेक्षा नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. (supriya sule on vinod tawde allegations of money distribution in virar)

ठाकरे गटाचे नेता अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमध्ये पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर टाकला, तर त्यानंतर विरारमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. आमदार क्षितिज ठाकूर तसेच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – Hitendra Thakur : आयोगाने पत्रकार परिषद थांबवायला सांगितली; ठाकूरांचा भाजपावर निशाणा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गेली 10 वर्षे हे सत्तेत आहेत. नोटाबंदी देखील याच सरकारच्या काळात झाली. तरीही एवढे पैसे येतात कुठून, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली. नोटाबंदीनंतरही एवढी रोख रक्कम कशी येते, ती विरारपर्यंत कशी पोहोचते, असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.

- Advertisement -

पैसे वाटल्याचा आरोप विनोद तावडेंवर होणे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे. सध्या जी भाजपा आहे, ती खरी भाजपाच नाही, ती भाजपा 2.0 आहे. त्याबद्दल मी नेहमीच बोलते. पण, तावडेंसारखी जी मूळ भाजपाची माणसे आहेत, अशा लोकांकडून असे कृत्य कधीच घडणार नाही. हे खूप अस्वस्थ करणारं आहे. हे जर तावडेंनी केलं असेल, तर ही घटना अत्यंत अनपेक्षित आहे. तावडेंसारख्या व्यक्तीकडून असं काही घडणे हे अस्वस्थ करणारं आहे, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : विरारमध्ये भाजपा नेते विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप, ठाकूरांचा गंभीर आरोप

विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न विचारला असता, हा माझा मुद्दा नाही. ही घडलेली घटना खरी असेल तर भारतातील नागरिक न्याय मागतो आहे. अशा घाणेरड्या आणि गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. भाजप आता पॅनिक झाली आहे. सरकार येत नाही असं त्यांना कळलं असावं, त्यामुळे अशा गोष्टी घडत असाव्यात. पण घडलेली गोष्ट खरी असेल तर भाजपाकडून कधीच अशी अपेक्षा नव्हती. तावडेंसंदर्भात अशी बातमी येणं, ही अत्यंत दुःख देणारी गोष्ट असल्याचेही सुळे म्हणाल्या. (supriya sule on vinod tawde allegations of money distribution in virar)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -