राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास अख्ख्या पक्ष घेऊन दर्शनाला येईन, सुप्रिया सुळेंचा तुळजाभवानीला नवस

supriya-sule-prayed-to-tulja-bhavani-devi-to-become-the-chief-minister-of-ncp

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी दौऱ्याचा शेवट महाराष्ट्रीच कुलस्वामीनी तुळजाभवानीचे (Tulja Bhavani Devi) दर्शन घेऊन केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, आशा नवस देवीकडे केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगीतले. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान राष्ट्रवादीला मिळालेला नाही. ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तुळजा भवानी देवीकडे पार्थना केली.

देवीकडे केला नवस –

राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शेतकऱ्यांसाठी प्रार्थना –

यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्याचबरोबर तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तेव्हा त्यांनी यंदा राज्यात चांगला पाऊस होऊ दे, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू दे, महागाई कमी होऊ दे, अशी प्रार्थना केली.