Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSupriya Sule : आत्मपरीक्षण करू आणि महाराष्ट्रासाठी...; पराभवाच्या 24 तासांनंतर सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule : आत्मपरीक्षण करू आणि महाराष्ट्रासाठी…; पराभवाच्या 24 तासांनंतर सुळेंची प्रतिक्रिया

Subscribe

निवडणुकीतील पराभावाला आता जवळपास 24 तास होत आले आहेत. अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पराभवावर भाष्य केले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली आहे. धक्कादायक म्हणजे महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर विजय मिळवता आला. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला फक्त 10 जागाच जिंकता आल्या. निवडणुकीतील पराभावाला आता जवळपास 24 तास होत आले आहेत. अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पराभवावर भाष्य केले आहे. (Supriya Sule reaction after 24 hours on the defeat in the assembly elections)

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला, तो नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण आणि समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू. आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ, असा विश्वास सुळेंनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : गुवाहाटीला आलेला आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल; एकनाथ शिंदे निवृत्ती घेणार? 

- Advertisement -

या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग, निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे सुप्रिया सुळे यांनी मनापासून आभार मानले आहेत.

हेही वाचा – Sharad Pawar : आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने जनतेसमोर जाणार; पवारांचा निर्धार


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -