घरमहाराष्ट्रघाणेरड्या पद्धतीचे राजकारण थांबायला हवे - सुप्रिया सुळे

घाणेरड्या पद्धतीचे राजकारण थांबायला हवे – सुप्रिया सुळे

Subscribe

राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा यांच्यासह विविध विषयावरून राजकारण सुरू आहे. नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. हे सर्व थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळेवर अंडी फेकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी सर्वांनी निषेधाची भूमिका नोंदवली होती. याबद्दल मी त्यांचे आभारही मानले होते. मात्र, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घ्यायला तयार आहे. मी भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधे मध्यस्थी करेन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

भाजपा नेते गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये बोलताना म्हटले होते की, पेट्रोल डिझेलवर राज्याचा टॅक्स हा जास्त आहे. त्यामुळेच राज्यात पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले आहेत. गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, गिरीश महाजन यांचा राष्ट्रीय स्तरावर खूप अभ्यास असून ते अभ्यासू व्यक्ती आहे,असे ते म्हणू शकतात.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -