मुंबई महापालिका निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंनी केले भाकीत, म्हणाल्या…

Supriya Sule said that Shiv Sena will win in Mumbai Municipal Corporation
Supriya Sule said that Shiv Sena will win in Mumbai Municipal Corporation

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे धुळे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांची जवळपास १०९ वेळा ईडीकडून चौकशी करण्यात आली. मग १०८ वेळा यंत्रणेला तपासात काहीच मिळाले नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी यावेळी विचारला. तसेच ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत त्यांनी भाष्य केले.

केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय पक्षांकडून चालवायच्या नसतात. या यंत्रणा प्रशासनाने चालवायच्या असतात, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. तर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजना फेल झाल्याचाही दावा त्यांनी केला. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांबाबत विचारले असता त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार आहे. तेथे शिवसेनेचाच महापौर निवडून येईल. करोना संसर्गाच्या काळात ज्याप्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केले आहे. ते पाहता मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी खान्देशस्तरीय विचार संवाद सभेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील समृद्ध, संस्कृतीचा मोठा वारसा असणाऱ्या खान्देशात शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, वनसंवर्धन अशा अनेक समस्या आहेत. मानवी विकास निर्देशांकात हे जिल्हे अति मागासलेले आहेत. आदिवासी बहुल व ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकास अपेक्षित आहे. मात्र, जोपर्यंत या विकास आराखड्याला योग्य दिशा, आर्थिक पाठबळ, आणि कृतीची जोड मिळत नाही, तोपर्यंत येथील विकास शक्य नाही, असे त्या म्हणाल्या.