घरमहाराष्ट्रकाही सांगण्यासारखं नाही म्हणून ईडी सरकारकडून रिवाइंड, प्ले काम; सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

काही सांगण्यासारखं नाही म्हणून ईडी सरकारकडून रिवाइंड, प्ले काम; सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

Subscribe

लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सकल मराठा क्रांती मोर्चाने हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात भाजप, शिंदे सरकारमधील आमदार, खासदारांसह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. याच मोर्चावर आता विरोधकांनी टीका केली आहे. सरकार ते रोजच आरोप करत आहेत. सहा महिने सत्तेत आल्यापासून या लोकांनी काहीच काम केलं नाही. स्वत:चं काही सांगण्यासारखं नाही त्यामुळे रिवाइंड आणि प्ले हे काम हे ईडी सरकार करत आहेत, असं टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डागलं आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी अनेक मुद्द्यांवरून त्यांनी शिंदे फडणवीसल सरकारवर निशाणा साधला आहे.

शिंदे – फडणवीस सरकारच्या मोर्चावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर मोर्चा म्हणजे सरकार विरोधात आहेत. हे असंवेदनशील सरकार आहे. म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागत आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे. तसेच लव्ह जिहादचा अर्थ मला माहित नाही. लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा अर्थ मला कळत नाही, असही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

सगळं दुर्दैवी आहेत. हे ईडी सरकार प्रशासनात कमी आहे आणि त्यांची चुकीची काम चालू आहेत. हे लोकं मोदीजी यांचे भाषण ऐकत नाहीत. मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे. सेवा सोडून हे लोक सगळेच काम करतात, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी फडणवीसांवर निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांना सरकार कसं चालवायचं याचे सल्ले देत असतात. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर तुरुंगात टाकण्याच्या केलेल्या आरोपांवर त्या म्हणाल्या की, आप से ये उम्मिद न थी. या सगळ्या खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर काम करावं. पुण्यात किंवा राज्यात अनेक गुन्ह्यांबाबत चर्चा करायला हवी होती. त्यासोबत त्यांनी गुन्ह्यांच प्रमाण कसं कमी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

- Advertisement -

शिवसेनाच्या चिन्हावरील लढाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्याचा उत्तराधिकारी देखील त्यांनी स्वत: ठरवलेला आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह वेगळ्या कुणाला तरी मिळणे, ते योग्य होणार नाही. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी उत्तराधिकारी ठरवला. त्यांनाच ते चिन्ह मिळाले पाहिजे.


सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल होण्याची इच्छा, म्हणाल्या, पक्षाने ठरवले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -