घरमहाराष्ट्रकुंकू छान दिसतंय! खासदार सुप्रिया सुळे म्हणतात प्रागतिक विचारांचा...

कुंकू छान दिसतंय! खासदार सुप्रिया सुळे म्हणतात प्रागतिक विचारांचा…

Subscribe

पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीने कुंकू लावू नये अशी प्रथा पाळली जाते. या प्रथेला मुठमाती देत सुप्रिया सुळे यांनी याआधीही एका महिलेच्या कपाळी कुंकू लावलं होतं. तेव्हाही त्यांच्या या कृतीचं कौतुक करण्यात आलं होतं.

बारामती – पुरोगामी महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी टिकलीवरून वाद निर्माण झाला होता. आधी टिकली लावून ये मगच तुझ्याशी बोलेन अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला दिली होती. यावरून राजकीय नेतेमंडळींनीही संभाजी भिडेंवर आगपाखड केली. त्यात, सुप्रिया सुळेही होत्या. आता त्यांनी त्यापुढे जाऊन पतीच्या पश्चात पारंपरिक जोखडात राहणाऱ्या महिलेच्या कपाळावर कुंकू लावलं आहे. एवढंच नव्हे तर इतर महिलांनाही कुंकू लावण्यास प्रोत्साहन दिलं.

बारामती लोकसभा मतदारसंघातील वरवंड येथील ज्येष्ठ नेते रामदासनाना दिवेकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांचं सात्वंन करण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रामदासनाना दिवेकर यांच्या पत्नीच्या मीनाताईंच्या कपाळावर कुंकू लावलं. तसंच, तिथे उपस्थित असलेल्या महिलांनाही त्यांच्या कपाळावर कुंकू लावण्यास प्रोत्साहन दिलं.

- Advertisement -


पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीने कुंकू लावू नये अशी प्रथा पाळली जाते. या प्रथेला मुठमाती देत सुप्रिया सुळे यांनी याआधीही एका महिलेच्या कपाळी कुंकू लावलं होतं. तेव्हाही त्यांच्या या कृतीचं कौतुक करण्यात आलं होतं. आता पुन्हा त्यांनी मीनाताई दिवेकर यांच्या कपाळावर कुंकू लावून, ‘कुंकू आता छान दिसतंय. रोज कुंकू लावत जा,’ असा सल्ला दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)


दरम्यान, संभाजी भिडे यांनी टिकलीवरून एका महिला पत्रकाराला रोखलं होतं. तेव्हाही सुप्रिया सुळे यांनी पुरोगामी भूमिका घेतली होती. ‘मी लावतो टिळा, तू लाव टिकली परंपरेच्या बाजारात, अक्कल आम्ही विकली,’ अशी सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -