पुणे : मी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप केले. त्याविरोधात राजकीय नैतिकतेच्या आधारावर सगळे पक्ष एकत्र येतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला वाईट वाटत आहे. मला कधीच वाटलं नव्हतं, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटतील. त्यामुळे मी उद्या मस्साजोग आणि परळी येथे जाणार आहे. संतोष देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी पाठीशी उभे राहणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (Supriya Sule warns that she will not rest until justice is served to Deshmukh and Munde families)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुरेश धस मॅनेज झाले याची शक्यता नाकारता येत नाही. बीडमध्ये कोणतेही राजकारण आणू नये. सुरेश धस यांच्याकडून मला खूप अपेक्षा होती. सुरेश धस मॅनेज आहेत का? याचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे देतील. कारण त्यांनीच चार तास मीटिंग अरेंज केली होती. अजित पवार म्हणाले की, माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता. छगन भुजबळ, अशोक चव्हाण आणि आर आर पाटील यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. राज्यात अनेक जणांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. मला कधीच वाटलं नव्हतं सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटतील. बावनकुळे म्हणाले, मीटिंग चार तास झाली. आम्हाला राजकारण करायचे नाही. परंतु पारदर्शक चौकशी होऊन न्याय मिळाला पाहिजे. अंजली दमानिया यांनी सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहेत. त्यामुळे आता पारदर्शक चौकशी होऊन सरकारने नैतिकता दाखवली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.
हेही वाचा – Beed : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, 25 फेब्रुवारीपर्यंतचा इशारा दिला
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा शोधण्यासाठी राज्याची यंत्रणा उभी राहिली. पण संतोष देशमुख यांची हत्या होऊन 70 दिवस लोटले तरी या प्रकरणातील पाचवा आरोपी अजूनही सापडला नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परभणी व बीड या दोन्ही घटनांतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. बीडमधील देशमुख कुटुंबीय सध्या प्रचंड अस्वस्थ आहे. त्या कुटुंबाला आधार द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे मी मंगळवारी त्यांना भेटण्यास जात आहे. देशमुख यांची मुलगी बारावी परीक्षेच्या काळात वणवण फिरत वडिलांसाठी न्याय मागत आहे. तिचे अश्रू या सरकारला दिसत नाहीत, असेही सुळे यांनी बोलताना सांगितले.
हेही वाचा – Jitendra Awhad : अजित दादांची घुसमट, सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही; आव्हाडांनी सगळंच सांगितलं