घरताज्या घडामोडीNCP : बारामतीत सुप्रिया सुळे अडीच लाख मताधिक्क्याने निवडून येतील; रोहित पवारांचा...

NCP : बारामतीत सुप्रिया सुळे अडीच लाख मताधिक्क्याने निवडून येतील; रोहित पवारांचा दावा

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा अर्ज भरणाप्रक्रीय पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाचे जगावाटप पूर्णपणे झाले नाही. परंतू, यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रातील काही मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहेत. यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदार.

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा अर्ज भरणाप्रक्रीय पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाचे जगावाटप पूर्णपणे झाले नाही. परंतू, यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रातील काही मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहेत. यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदार. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. पण अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच, महायुतीकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक वक्यव्य केले आहे. या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (Supriya Sule Will Win Baramati Lok Sabha Poll With Margin Of 2 Lakh 50 Thousand Votes says Rohit Pawar ncp)

बारामती लोकसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील भेकराईनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मताधिक्क्याने निवडून येतील”, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला.

- Advertisement -

याशिवाय, “बारामती लोकसभा मतदार संघासाठी अजित पवार यांच्याकडून जे कोणी उमेदवार असतील. त्यांच्या बाबत अजित पवार यांच्याकडून ९ सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये अजित पवार यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर सुप्रिया सुळे या त्यांच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हणजेच दहावा सर्व्हे करतील आणि योग्य असा निर्णय घेतील. मागील काही महिन्यांत भाजपने देशात आणि राज्यात पक्ष, कुटुंब फोडाफोडीची जी कार्यपद्धती अवलंबली आहे.त्यावर भाजपचे अनेक नेते मंडळी नाराज आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यामुळे एकूणच परिस्थिती बघता, भाजपला त्यांचाच भाजपचा मतदार मतदान करणार नसल्याचे हे दिसून येते”, असेही रोहित पवार म्हणाले.


हेही वाचा – Loksabha Election 2024 : अखेर (शिव)तारे जमीं पर; बारामतीमधून माघार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -