शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Supriya Sule's reaction to Sharad Pawar's presidential candidature

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. विरोधकांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबतत चर्चा केली होती. तर दुसरीकडे राष्ट्रपतीपदाची उमेदवारी शरद पवार यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार यांनी केली भूमीका स्पष्ट – 

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यावर मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी विरोधकांचे उमेदवार आपण नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही, असे शरद पवारांनी कॅबिनेट मंत्र्यांना सांगितले.

सुप्रिया सुळेंची काय म्हणाल्या –

दरम्यान शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील तर भाजपाने पाठिंबा द्यावा असे संजय राऊतांनी म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, मला याबदल काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते, मी एक खासदार आहे. त्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी यावेळी आभार मानले.

कधी आहे निवडणुक –

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.